Letter Of King Charles Five: जुन्या काळात पत्र व्यवहार हे दूरच्या संवादाचं प्रभावी माध्यम होतं. राजानं नेमलेला दूत संदेश घेऊन जात असे. पत्रव्यवहारासाठी कबुतरांनाही विशेष ट्रेनिंग दिली जात होती. मात्र अनेकदा पत्रातील मजकूर सीक्रेट असायचा. अनेकदा पत्रात कोडवर्ड वापरले जायचे. या कोडवर्डमुळे समोरच्या व्यक्तीली जो काही संदेश द्यायचा आहे तो मिळून जायचा. त्याच्या व्यतिरिक्त कोणालाही त्या कोडवर्डचा अर्थ समजत नव्हता. असंच एक 500 वर्षे जुनं पत्र समोर आलं आहे. रोमन साम्राज्याचे महान राजांमध्ये चार्ल्स पंचम यांचा नावलौकीक होता. त्यांच्या राज्य कारभाराची चर्चा आजही होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार 16 व्या शतकात चार्ल्स पंचम यांनी एक पत्र लिहिलं होतं. हे पत्र त्यांनी 1547 मध्ये आपल्या राजदुताला लिहिलं होतं. मात्र हे पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचलं नव्हतं. त्यानंतर हे पत्र हाती लागलं मात्र पत्रातील भाषा समजण्यापलीकडे होती. आता पाचशे वर्षानंतर ही भाषा डिकोड करण्यात यश आलं आहे. 


पत्रात विचित्र चिन्हांचा वापर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्टनुसार, पत्रातील मजकुरात विविध चिन्ह असल्याने अनेकांना त्यातील अर्थ उमगला नाही. मात्र फ्रान्स शास्त्रज्ञांनी संशोधनानंतर त्यातील चिन्हांचा अर्थ शोधून काढला आहे. पत्रातील मजकूर डिकोड केल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. हे पत्र फ्रान्सच्या राजाने राजदुताला लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी भीती व्यक्त करत लिहिलं होतं की, माझी हत्या होण्याची शक्यता आहे. 


बातमी वाचा- Desi Jugaad: घरगुती सिलिंडरच्या माध्यमातून कपड्यांना कडक इस्त्री, देसी जुगाडचा Video Viral


पत्र सोशल मीडियावर व्हायरल


सीक्रेट बातमी सांगण्यासाठी राजाने वापरलेली भाषा वेगळी होती. खरं तर ही भाषा त्याकाळी समजण्यापलीकडे होती. या पत्रात काही खास कॅरेक्टर्सचा वापर करण्यात आला होता. शास्त्रज्ञांनी हे पत्र डिकोड केलं असलं तरी अजूनपर्यंत पूर्ण रिपोर्ट आलेला नाही. मात्र पत्र आणि राजाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.