लंडनमध्ये एका 10 वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला होता. 10 ऑगस्ट 2023 रोजी घरातील बेडवरच तिचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. तिच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या होत्या. तिच्या शरिरावर चटके दिल्याचे, चावा घेतल्याच्या खुणा दिसल्या. याशिवाय तिच्या शरिरातील अनेक हाडंही मोडलेली होती. मुलीचा मृतदेह सापडण्याच्या एक दिवस आधी तिच्या बापाने पाकिस्तानला पळ काढला होता. दरम्यान ब्रिटीश-पाकिस्तानी 10 वर्षाच्या मुलीच्या वडिलांनी आपण आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तिला हानी पोहोचवण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता असाही दावा त्याने केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिचे वडील उरफान शरीफ (42) तिचा मृतदेह सापडण्याच्या एक दिवस आधी, पत्नी बेनाश बटूल (30), काका फैसल मलिक(29) यांच्यासह पाकिस्तानात पळून गेले होते. तिघांनीही हत्येचा आणि मुलीच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यास कारणीभूत नसल्याचं म्हटलं होतं. 


सेंट्रल लंडनमधील ओल्ड बेली कोर्टात पुरावे देताना उरफान शरीफने यापूर्वी साराची सावत्र आई बटूल हिला दोषी ठरवलं होते आणि तिने तिला मारण्याची कबुली देण्यास भाग पाडल्याचा दावा केला होता. परंतु बुधवारी पत्नीच्या वकिलाच्या चौकशीत टॅक्सी चालक असणाऱ्या उरफानने सांगितलं की जे घडले त्याची संपूर्ण जबाबदारी त्याने घेतली आहे. परंतु त्याचा मुलगा साराला दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. 


साराचा मृत्यू तू मारहाण केल्यामुळे झाला का? असं विचारलं असता तो म्हणाला की, "हो, तिचा मृत्यू माझ्यामुळे झाला". त्याने साराच्या मृत्यूच्या काही आठवड्यांपूर्वी तिला मारहाण करत हाडं मोडल्याची कबुलीही दिली. तिला बांधलेलं असताना बॅटने मारहाण केली, तसंच गळा दाबला आणि तिच्या मानेचे हाड मोडले अशी कबुली त्याने दिली आहे. 


"मी संपूर्ण जबाबदारी घेऊ शकतो. मी प्रत्येक छोटी गोष्ट स्विकारत आहे," असं त्याने सांगितलं आहे. तसंच 8 ऑगस्टला मी साराला खूप मारहाण केली, ज्यामुळे ती कोसळली आणि मृत्यू झाला अशी कबुली त्याने दिली. 


मात्र खुनाच्या आरोपात आपण दोषी नसल्याचं त्याचा दावा आहे. "मला तिला दुखवायचं नव्हतं. तिला हानी पोहोचवण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता," असं त्याने कोर्टात सांगितलं. 10 ऑगस्ट रोजी साराचा मृतदेह तिच्या पलंगावर आढळून आला. इस्लामाबादमध्ये आल्यानंतर तिच्या वडिलांनी ब्रिटीश पोलिसांना फोन केला आणि सांगितले की त्यांनी आपल्या मुलीला खूप मारहाण केली. 


तिच्या शेजारी एक लेखी कबुलीजबाब सापडला आहे. शवविच्छेदन केलं असता तिची 25 हाडं मोडल्याचं समोर आलं. तिच्या शरीरावर चटके दिल्याच्या आणि चावा घेतल्याच्याही खुणा आहेत. पण उरफानने हे नाकारलं आहे. 13 सप्टेंबर रोजी सर्वजण युकेला परतले तेव्हा त्यांना अटक करण्यात आली.