लाहोर : पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक हिंदूंच्या मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 50 आरोपिंना अटक केली असून इतर 150 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिराचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याबद्दल पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court)  अधिकाऱ्यांना फटकारले होते. ज्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. लाहोरपासून 590 किमी अंतरावर रहिम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरात बुधवारी जमावाने गणेश मंदिरावर हल्ला केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रहिम यार खान जिल्ह्यातील जिल्हा पोलीस अधिकारी (DPO) सरफराज यांनी सांगितलं की, 'भोंगमधील कथित मंदिर हल्ल्याप्रकरणी आम्ही आतापर्यंत 50 संशयितांना अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजची चौकशी सुरू आहे. येत्या काही दिवसांत संबंधित अन्य आरोपिंना देखील अटक केली जाईल.'


ते पुढे म्हणाले, दहशतवादाच्या आणि पाकिस्तान दंड संहितेच्या (पीपीसी) संबंधित कलमांखाली मंदिरावर हल्ला केल्याबद्दल 150 पेक्षा जास्त लोकांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे.' त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मंदिराच्या  दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं.