अफगाणिस्तानच्या महिला लष्करी अधिकाऱ्यांना भारताचं प्रशिक्षण...
वीस अफगाण महिला अधिकारी ट्रेनिंगसाठी भारतात आल्यात.
चेन्नई : वीस अफगाण महिला अधिकारी ट्रेनिंगसाठी भारतात आल्या आहेत.
तालीबानविरूद्धची तयारी
चेन्नईतल्या लष्कराच्या ट्रेनिंग अकादमीमध्ये या अफगाण महिला अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या प्रशिक्षणामागचा मुख्य हेतू तालीबानविरूद्ध लढाईत अफगाण सैन्याची बाजू वरचढ ठरावी हा आहे. या प्रशिक्षणामुळे भारत-अफगाण आणखी दृढ होण्यास मदत होईल.
कुटुंबाशी आणि समाजाशी संघर्ष
भारतीय लष्करी गणवेष धारण केलेल्या या महिला अधिकाऱ्यांनी त्यांचा पारंपारिक हिजाबसुद्धा परिधान केला होता. अफगाणिस्तानात महिलांना खूप बंधनांमध्ये जगावं लागतं. आपल्या देशाच्या रक्षणाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी या महिलांनी स्वत:च्या कुटुंबाशी आणि समाजाशी संघर्ष केलाय.
परिपूर्ण प्रशिक्षण
या प्रशिक्षणाचा कालावधी २० दिवसांचा आहे. या कालावधीत त्यांना शस्त्र हाताळणी, संकेतांचा वापर, नकाशांचा वापर, संपर्काच्या साधनांचा वापर आणि संगणकाचा वापर या सर्व गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे.