Earthquake News : देशाची राजधानी दिल्ली भूकंपानं हादरली आणि पुन्हा एकदा तुर्की भूकंपाच्या भीषण आठवणी जाग्या झाल्या. भूकंपामुळं तुर्कस्तानाच झालेला विध्वंस पाहता भारतावर अशी वेळ येऊ नये अशीच प्रार्थना अनेकजण करत असतानाच आशिया खंडातील काही देशांना भूकंपाचे जबर हादरे बसले. मंगळवारी अफगाणिस्तानातील हिंदुकुश (Hindukush) भागातही 6.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला ज्यामुळं भारत आणि पाकिस्तानही हादरलं. (Afghanistan Earthquake was predicted by a Dutch researcher delhi Earthquake latest Marathi news )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानातील (Afghanistan Earthquake) या भूकंपात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तर, पाकिस्तानात 9 जणांचा मृत्यू ओढावला. 160 हून अधिजण जखमी झाले. ही नैसर्गिक आपत्ती येणार याबाबतची पूर्वसुचना संशोधकांकडून याआधीच देण्यात आली होती. Prediction Of Earthquake


तुर्कीतील महाविनाश... (Turkey Earthquake)


फेब्रुवारी महिन्यात तुर्कीमध्ये आलेल्या भूकंपानं 50 हजारांहून अधिक बळी घेतले. या विध्वंसानंतर डच संशोधक फ्रँक होगरबीट्स (Frank Hogarbeats) यांनी पुढील जबर हादरा आशिया खंडातील देशांना बसू शकतो असं भाकित त्यांनी केलं होतं. याबाबतचा एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला होता.


हेसुद्धा वाचा : Indian Railways : वा रे वा...! लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास आणखी स्वस्त; पाहा कसा मिळवाल रिफंड


Hogarbeats काय म्हणाले होते?


येत्या काळात आशियाई देशांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो असं म्हणत हा भूकंप अफगाणिस्तानातून सुरु होऊन पाकिस्तान आणि भारत ओलांडून हिंदी महासागरात अंतिम टप्प्यात येईल असं Hogarbeats यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळं त्यांचं भाकित खरंच ठरलं हे आता आलेल्या संकटानंतर लक्षात येत आहे.



दिल्लीत इमारती झुकल्या? (Delhi Earthquake)


दरम्यान, दिल्लीत भूकंपाचे हादरे जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. या भूकंपाची तीव्रता पाहता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही तातडीनं कामाला लागल्या. यातच अग्निशमन दलानं धक्कादायक माहिती देत भूकंपानंतर दिल्लीतील काही इमारती झुकल्याचंही सांगितलं. त्यामुळं दिल्लीमध्ये सध्या भीतीचं वातावरण कायम आहे.