China's JUST Telescope: एलियन अस्तित्वात आहेत की नाही याचा ठोस पुरावा अद्याप कुणीही देऊ शकलेले नाही. एलियनच्या अस्तित्वाबाबत अनेक हेवे दावे केले जातात. अनेकांनी एलियनचे अस्तित्व असल्याचा दावा केला आहे. तर, अनेकांनी हे दावे फेटाळले आहेत. आता दोन वर्षानंतर मानव Alien चा शोध घेणार आहे. चीन  हिमालयाच्या टोकावर अंतराळात डोकावणार सर्वात शक्तीशाली दुर्बिण बसवणार आहे. JUST असे चीनच्या या दुर्बिणचे नाव आहे. 


2026 पर्यंत चीन एलियनचा शोध घेणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकजण UFO पाहिल्याचा दावा करतात. मात्र, अद्याप एलियनशी संपर्क झालेला नाही. एक्सोप्लॅनेट्स अर्थात बाह्य ग्रहांवर एलिनयचे अस्तित्व असल्याचा दावा सातत्याने अनेक खगोलसंशोदकांडून केला जातो. चीन आपल्या JUST या दुर्बिणीच्या माध्यमातून ब्रम्हांडातील एक्सोप्लॅनेट्सचे निरीक्षण करुन या बाह्य ग्रहांवर खरचं एलियनचे अस्तित आहे का याचा शोध घेणार आहे. 2026 पर्यंत या दुर्बिणच्या मदतीने एलियनचा शोध घेतला जाईल असा दावा चीनने केला आहे. 


चीनने सर्वात शक्तीशाली दुर्बिण


चीनच्या या सर्वात शक्तीशाली दुर्बिणचे नाव JUST असे. JUST याचा अर्थ जिओटॉन्ग युनिव्हर्सिटी स्पेक्ट्रोस्कोपिक टेलिस्कोप असा आहे.  शांघाय जिओटोंग विद्यापीठाने या दुर्बिणची निर्मीती केली आहे. उत्तर-पश्चिम हिमालयाच्या साईशिटेंग या उंच पर्वतांवर हे दुर्बिण बसवले जाणार आहे. साईशिटेंग हा पर्वत उत्तर-पश्चिम चीनमधील किंघाई प्रांतातील लेंगूजवळ आहे. चीनी वैज्ञानिक या दुर्बिणीच्या माध्यमातून अवकाशाचे निरीक्षण करुन  एक्सोप्लॅनेट्स शोध घेणार आहेत. प्रामुख्याने एलियनचे अस्तित्व शोधण्याचा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.


चीनचे दुर्बिण अंतराळातील अनेक रहस्य उलगडणार


चीनचे हे दुर्बिण अंतराळातील अनेक रहस्य उलगडणार आहे. या दुर्बिणीचे अपर्चर 4.4 मीटर इतके आहे. या दुर्बिणीच्या माध्यमातून अवकाशातील अनेक घडामोडींचे एकाचवेळी निरीक्षण करता येवू शकते. हा कॅमेरा  हाई-प्रेसिशन स्पेक्ट्रोमीटरने सुसज्ज आहे. यामुळे अवकाशाचे मल्टी-टारगेट सह हाई-प्रेसिशन स्पेक्ट्रल निरीक्षण करणे अगदी सहज शक्य होणार आहे.


चीनचा एलियन शोधल्याचा दावा


यापूर्वी देखील चीनने एलियन शोधल्याचा दावा केला होता.  चीनच्या शक्तिशाली स्काय टेलिस्कोपला एलियन्सचे काही पुरावे मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. चीनचा 'तियानआन' हा जगातील सर्वात शक्तिशाली सिंगल अॅपर्चर टेलिस्कोप मानला जातो.  'तियानआन' या मॅड्रियन शब्दाचा अर्थ 'स्वर्गाचा डोळा' असा आहे.  या 'डोळ्या'नं अंतराळातील काही विशिष्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल पकडले असून त्याद्वारे परग्रहावरील सृष्टीचा दावा करण्यात आलाय.  चीनची सरकारी वेबसाईट 'सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेली'वर हा शोधनिबंध प्रसारित करण्यात आला होता. मात्र शास्त्रज्ञ झांग टोंजिए यांचा हा निबंध कालांतरानं हटवण्यात आला.