Google AI Tests: गुगल आता बातम्या, लेख लिहिण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स म्हणजेच एआयचा वापर करत आहे. या साधनांचा वापर पत्रकारांनी आपल्या दैनंदिन कामात करावा, यासाठी वृत्त संस्थांशी चर्चादेखील करत आहे. गुगलकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली. गुगलने वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल-मालक न्यूज कॉर्पोरेशन आणि अगदी न्यूयॉर्क टाइम्ससह इतरांशी चर्चा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही एआय साधने पत्रकारांना हेडलाईन्स किंवा वेगळ्या प्रकारच्या लेखन शैलीसाठी विविध पर्याय देऊन मदत करू शकेल. यातून पत्रकारांच्या कामातील उत्पादकता वाढेल असे सांगण्यात आले. आम्ही विविध कल्पना शोधण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत, अशी माहिती गुगलच्या प्रवक्त्याने दिली. पत्रकारांना त्यांच्या लेखांचे अहवाल तयार करण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने ही साधने मदत करतील.


पत्रकारितेचा मूळ गाभा तसाच राहणार


असे असले तरी बातमीतील रिपोर्टींग, फॅक्ट हा पत्रकारिचा मुळ गाभा हे एआय टूल्स बदलू शकत नाहीत. ते पत्रकारांना स्वत:च करावे लागणार आहे.गुगलकडून करण्यात आलेल्या या विनंतीला  NYT आणि वॉशिंग्टन पोस्टने त्वरित प्रतिसाद दिला नाही. न्यूयॉर्क टाइम्सने यासंदर्भात माहिती दिली आहे.


पत्रकारिता क्षेत्रात होणार फायदा


बातम्यांमध्ये जनरेटिव्ह एआयचा वापर एक्सप्लोर करण्यासाठी ChatGPTने OpenAI सोबत भागीदारी करेल असे असोसिएटेड प्रेसने म्हटले होते. याच्या काही दिवसांतच आलेला हा करार उद्योगांमधील समान भागीदारीचा आदर्श सर्वांसमोर ठेवू शकतो. याचा पत्रकारिता क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.


दोन्ही कंटेंटमध्ये मोठा फरक स्पष्ट दिसतो


पत्रकारिता क्षेत्रातील काही संस्था आधीपासूनच कंटेट तयार करण्यासाठी जनरेटिव्ह एआय वापरत आहेत. पण एआयचा वापर करताना आजही तथ्यात्मक चुकीची माहिती निर्माण होते. तसेच माणसाने तयार केलेल्या आणि संगणाकाच्या मदतीने एआयने तयार केलेल्या कंटेंटमध्ये मोठा फरक स्पष्ट दिसतो. हे मोठे आव्हान असल्याने बातम्या प्रकाशने तंत्रज्ञानाचा अवलंब कमी गतीने करत असल्याचे सांगण्यात आले आहे.