ही मळकी, फाटकी जीन्स खरेदी करण्यासाठी तुम्ही किती रुपये मोजाल? खरी किंमत पाहून विषयच बदलाल
सोशल मीडियावर एका मळकट जीन्सचा फोटो व्हायरल होत आहे, तिची विक्री चक्क लाखो रुपयांना करण्यात आली आहे.
Levis jeans : चांगल्यातली चांगली जीन्स खरेदी करण्यासाठी सर्वसाधारणपणे किती रुपये खर्च केले जातात? या प्रश्नाचं उत्तर देत तुम्ही म्हणाल साधारण 3 ते 5 हजार रुपये. खिसा भरलेला असेल, तर काहीजण चांगल्या जीन्ससाठी तितकेच तगडे पैसेही मोजतात. पण, एखाद्याचं घर खरेदी करता येईल इतरी रक्कम एका जीन्ससाठी मोजल्याचं तुम्ही कधी पाहिलंय का? नसेल पाहिलं, तर आता पाहूनच घ्या. कारण, सोशल मीडियावर एका मळकट जीन्सचा फोटो व्हायरल होत आहे, तिची विक्री चक्क लाखो रुपयांना करण्यात आली आहे. (amazing Levis jeans from 1880s sold for 76,000 dollars in an auction)
वॉल स्ट्रीट जर्नलच्या माहितीनुसार ही मळकी जीन्स अमेरिकेतील एका निर्जन खाणीतून 1880 ला सापडली होती. इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही ती सुस्थितीत आहे. 1 ऑक्टोबरला सॅनडिअॅगोमध्ये असणाऱ्या जुन्या कपड्यांच्या डीलर्सनी ती खरेदी केरली आहे. या जीन्ससाठी त्यांनी 62 लाख रुपये मोजले.
अधिक वाचा : भारताची भीती की आणखी काही? कोहिनूर हिऱ्याबाबत British Royal Family चा मोठा निर्णय
केल हॉपर्ट आणि जिप स्टीवंसन यांनी ही जीन्स खरेदी करत साधारण बोली लावलेल्या रकमेपैकी 90 टक्के रक्कम भरलीये. आता ही जीन्स आणखी महाग किंमतीला विकू, अशी त्यांनी आशा व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर त्यांनी काही फोटोही शेअर केले. ज्यामध्ये जीन्स अगदी व्यवस्थित दाखवण्यात आली आहे.
लिवाईसचा इतिहास... (levis jeans history)
अमेरिकन क्लोथिंग (American Clothing brand) ब्रँड लिवाईसची स्थापना 1853 मध्ये झाली होती. जगभरात डेनिम्ससाठी ही कंपनी सध्या प्रसिद्ध आहे. त्यातच ही खाणीतली सुस्थितीत असणारी जीन्स पाहता लिवाईसच्या दर्जेदार कापडाचीही जगभरात चर्चा आहे. असं म्हणतात की, खाणीत काम करणाऱ्या मजदुरानं ही जीन्स वापरली असावी. ही जीन्स Gold Rush काळातली असून, त्याच्या कंबरेवर सस्पेंडर बटन आणि बॅक पॉकेट्स आहेत.
सगळं ठीक, पण या जीन्ससाठी मोजण्यात आलेली रक्कम नेटकऱ्यांना चक्रावून सोडत आहे. लिलावातूनही जीन्स ज्या किमतीला विकत घेतली ती पाहून, ही मंडळी बरीयेत ना? असाच प्रश्न अनेकांना पडला. काहींनी तर या रकमेत घर खरेदी करता आलं असतं.... अशाही प्रतिक्रिया दिल्या.