Ancient Temple in Italy : इटलीमध्ये प्राचीन संस्कृतीचे अनेक रहस्य दडलेली आहेत. इटलीत समुद्राच्या तळाशी सापडले प्राचीन मंदिर सापडले आहे. या मंदिराचे  रहस्य जाणून शास्त्रज्ञही अचंबित झाले आहेत. संशोधनदरम्यान हे मंदिर सापडले आहे. हे अवशेष नबातियन संस्कृतीशी संबंधित असल्याचे समजते. मंदिराचे हे अवशेष 18 व्या शतकातील आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरातत्वशास्त्रज्ञांना दक्षिण इटलीच्या कॅम्पानियाजवळील पोझुओली बंदराजवळील समुद्राच्या तळाशी हे मंदिराचे अवशेष सापडले आहेत. मंदिराच्या या अवशेषांमुळे अनेक रहस्य उलगडणार आहेत.  मंदिराच्या अवशेषांसह, संशोधकांना दोन प्राचीन रोमन संगमरवरी देखील सापडल्या, यांच्यावर अतिश सुंदर कोरीव काम करण्यात आले आहे. स्थापत्य कलेचा हा एक अद्भुत  नमुना मानला जात आहे. 


नबातियन हे रोमन साम्राज्याचे एक मैत्रीपूर्ण साम्राज्य होते. रोमन काळात, नबातियन साम्राज्याचा विस्तार युफ्रेटिस नदीपासून तांबड्या समुद्रापर्यंत होता.  अरबी द्वीपकल्पात पेट्रा वाळवंटात असलेली बातियन साम्राज्याची राजधानी होती. नाबॅटियन साम्राज्याचा विस्तार पोझुओली बंदरापर्यंतही झाला, जे रोमन भूमध्यसागरीयातील सर्वात मोठे व्यापारी बंदर होते.


18 व्या शतकाच्या मध्यात, प्राचीन पोझुओलीच्या भागामध्ये नबातियन देवतेला माननारे अनेक लोक होते. येथे नबातियनचे राज्य होते.  प्राचीन काळी फक्त नबताई समाजातील लोकच या देवतेची पूजा करत असत.


या मंदिराचे रहस्य काय?


नबातियन संस्कृतीशी संबंधित अत्यंत रहस्यमयी आहे. या मंदिराबद्दल अधिक माहिती गोळा केली जात आहे. या मंदिराबाबत अधिक माहिती उपलब्ध झाल्यास इटलीच्या या प्राचीन शहराच्या इतिहासाचे आणखी रहस्यमयी पैलू समोर येवू शकतात.  यापूर्वी संशोधनादरम्यान इटलीच्या गुहेत  5400 वर्ष जुनी रहस्यमयी खोपडी सापडली होती.