ऑस्ट्रेलियात लवकरच समलैंगिक विवाहाला सहमती....
समलैंगिक विवाह याबद्दल ऑस्ट्रेलिया एक देशव्यापी मतदान झाले.
मेलबर्न : समलैंगिक विवाह याबद्दल ऑस्ट्रेलियात एक देशव्यापी मतदान झाले. या ऐतिहासिक मतदानाला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. याबद्दल ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री मॅल्कम टर्नबुल यांनी सांगितले की, मतदानानुसार संसद ख्रिसमसपूर्वी हा नवा कायदा लागू करेल. ऑस्टेलियन ब्यूरो ऑफ स्टेटिस्टिक्स (एबीएस) यांनी समलैंगिक विवाहावर दोन महिन्यांपूर्वी पोस्टल सर्वे केला आणि त्याचा निकाल समोर आला आहे. तो अत्यंत चकीत करणारा आहे.
यात ६१.६ % लोकांनी समलैगिंक विवाहाला सहमती दर्शवली आहे तर ३८.४% लोकांनी विरोध केला आहे. ऑस्टेलियाचे प्रधानमंत्री समलैंगिक विवाहाला सहमती देणारे असल्याने त्यांनी हा निकाल पाहता ख्रिसमसपूर्वी हा नवा कायदा लागू करण्याची मागणी केली आहे.
सर्व्हेचे परिणाम लक्षात घेऊन टर्नबुल म्हणाले की, "आता यावर काम करणे आणि ते पूर्णत्वास नेणे आपले काम आहे. उद्यापासून यावर संसदेत चर्चा करण्यात येईल."