सिडनी : ऑस्ट्रेलिया संसदेच्या वरिष्ट सभागृहाने धर्म, रूढी आणि परंपरावाद्यांचा विरोध झूगारून समलैंगिक संबंधाबाबतचे विधेयक पारित केले. त्यामुळे या देशात समलैंगिक विवाहाचा मार्ग मोकळा झाला.


कनिष्ठ सभागृहाची मान्यता कधी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, वरिष्ठ सभागृहात तर मंजूरी मिळाली पण, समलैंगिक संबंधांबाबतच्या विधेयकाला संसदेच्या कनिष्ठ सभागृहात कधी मान्यता मिळणार याबाबत उत्सुकता आहे. येत्या क्रिसमसच्या आगोदर कनिष्ठ सभागृहात या विधेयकाला मान्यता मिळेल अशी चर्चा आहे. ऑस्ट्रेलियातील हाय प्रोफाईल समलैंगिक नेता आणि लेबर पार्टीच्या सदस्या पेन्नी वोंग यांनी म्हटले की, 'आम्ही स्वीकार, समावेशकता, सन्मान, उत्साहाचे भागिदार आहोत. सिनेटच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. कारण, त्यांनी आमच्या एलडीबीटीआयक्यू बंधूं आणि भगिणींच्या भावना समजून घेतल्या.'


रूढी परंपरांवाद्यांचा होता विरोध


दरम्यान, धर्म, रूढी, परंपरावाद्यांनी धार्मिक संरक्षणाचा मुद्दा उपस्थीत करत समलैंगिक संबंधांबाबतच्या विधेयकाला विरोध केला होता. मात्र, सिनेटने हा विरोध मोडीत काढत 12 विरूद्ध 43 मतांनी समलैंगिक विवाहांना मान्यता देणारे विधेयक पारित केले.