Banana peel mask : केळी हे एक फळ आहे जे त्याच्या पौष्टिक मूल्यांसाठी ओळखलं जातं. केळी हे एक सुपरफूड आहे असं म्हणायला हरकत नाही. केळ्यात सगळ्यात जास्त मिनरल्स असतात. इतकंच नाही तर त्यासोबतच केळ्याच्या सालीत अँटिऑक्सिडंट्स आणि क्षारांचेही प्रमाण खूप जास्त असते. केळी जितकी खायला चविष्ट वाटते आणि आरोग्यासाठी चांगली आहे त्याप्रमाणेच त्याच्या सालीचेही अनेक फायदे आहेत. केळीच्या सालीचे तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये समावेश केल्याने स्किन पोर्स बरे होण्यास आणि टॅनपासून देखील रोखू शकतात. तुमच्या स्किनकेअरमध्ये तुम्ही केळीची साल कशी वापरू शकता याबद्दल आज आपण येथे जाणून घेणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केळीच्या सालीचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
हेल्थलाइननुसार, केळीच्या सालीमुळे सुरकुत्याची समस्या दूर होऊ शकते. याव्यतिरिक्त, जर तुम्ही तुमच्या त्वचेवर केळीचे साल घासल तर ते तुमची त्वचा ब्राइट आणि ग्लोइंग बनवू शकते. शिवाय, तुमच्या डोळ्यांभोवती सूज किंवा पफीनेस असल्यास, केळ्याची साल त्यावर ठेवल्याने सूज कमी होऊ शकते. केळीची साल त्वचेला हायड्रेट करण्यास मदत करते आणि मुरुमांचे डाग काढून टाकण्यास मदत करते. इतकंच नाही तर मुरुमांची समस्या देखील दुर होते.


केळीच्या सालीपासून फेस मास्क कसा बनवाल
केळीच्या साली वापरून फेस पॅक बनवण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला, सालीचे लहान तुकडे करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर, त्यात एक चमचा मध, एक चमचा दही आणि केळीच्या सालीचे दोन तुकडे मिसळा. त्यांना ब्लेंडरमध्ये चांगले मिसळा. तुमचा फेस मास्क अशा प्रकारे तयार होईल.


हेही वाचा: Rocky Aur Rani Ki Prem Kahaani चित्रपटासाठी जया बच्चन ते रणवीर सिंह कलाकारांनी घेतले इतके मानधन


फेसमास्क कशा प्रकारे लावाल?
एका भांड्यात हा फेस पॅक काढून घ्या आणि तुमची मान आणि चेहरा पूर्णपणे धुवून स्वच्छ करा. संपूर्ण चेहऱ्यावर मास्क काळजीपूर्वक लावा. हा मास्क 15 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर चेहरा धुवा.  हा फेस मास्क लाावल्यानं त्वचेच्या विविध समस्या दूर करण्यात मदत होईल.


फेस मास्क बनवायला येत असेल कंटाळ तर करा हा पर्याय
तुम्ही केळीची साल थेट तुमच्या त्वचेवर घासू शकता. तुमचा चेहरा धुतल्यानंतर आणि पुसल्यानंतर, त्वचेवर साले हळूवारपणे घासून घ्या. 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून काढा.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)