Rocky Aur Rani Ki Prem Kahaani चित्रपटासाठी जया बच्चन ते रणवीर सिंह कलाकारांनी घेतले इतके मानधन

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani : 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर या चित्रपटातून करण जोहर हा बऱ्याच काळानंतर दिग्दर्शनात पुनरागमन करत आहे. खरंतर चित्रपटाच्या ट्रेलरला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. तर चित्रपटाविषयी अनेक गोष्टी इंटरनेटवर सर्च करण्यात येत आहेत. अशात नेटकऱ्यांनी या संपूर्ण टीमनं किती मानधन घेतलं हे देखील सर्च केलं. चला तर मग आज आपण या संपूर्ण टीमचं मानधन किती आहे ते जाणून घेणार आहोत. 

| Jun 23, 2023, 17:40 PM IST
1/7

रणवीर सिंह

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani

रणवीर सिंहनं या चित्रपटासाठी सगळ्यात जास्त मानधन घेतलं आहे. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटासाठी रणवीर सिंहनं 25 कोटी रुपये मानधन घेतल्याचे म्हटलं आहे. 

2/7

आलिया भट्ट

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani

आलियानं या चित्रपटासाठी 10 कोटी रुपये मानधन म्हणून घेतल्याचे म्हटले जाते. 

3/7

धर्मेंद्र

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani

धर्मेंद्र यांनी या चित्रपटासाठी 1 कोटी रुपये मानधन म्हणून घेतल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

4/7

शबाना आजमी

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani

शबाना आजमी यांनी देखील या चित्रपटासाठी 1 कोटी मानधन घेतल्याच्या चर्चा आहेत. 

5/7

जया बच्चन

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani

धर्मेंद्र आणि शबाना यांच्या प्रमाणेच जया बच्चन यांनी देखील 1 कोटी मानधन म्हणून घेतल्याचे म्हटले जाते. 

6/7

या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani

28 जुलै रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता येणार आहे. 

7/7

कोणाचे आहे प्रोडक्शन

Rocky Aur Rani Ki Prem Kahaani

या चित्रपटाचे प्रोडक्शन धर्मा प्रोडक्शनचे आहे. तर हा चित्रपट खूप रॉयल असणार असल्याचे म्हटले जात आहे.