Russia Ukraine War Latest Updates: रशियाच्या एकंदर हालचाली पाहता हे राष्ट्र सध्या गेल्या 7 महिन्यांपासून युक्रेनसोबत (Russia Ukraine War) सुरु असणाऱ्या युद्धाला आता पूर्णविराम देण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे. फक्त युक्रेनच नव्हे आता तर या देशाचं समर्थन करणाऱ्या नाटो राष्ट्रांनाही (NATO Countries) धडा शिकवण्याचा रशियाचा मनसुबा असल्याचं कळत आहे. ही दहशत संपूर्ण जगाभरात माजली आहे,  कारण रशियानं नाटो राष्ट्रांच्या सीमेनजीकच अण्वस्त्र वाहून नेणारी आणि हल्ला करणारी 11 न्यूक्लियर बॉम्बर जेट (Russia Nuclear Attack Plane)/ लढाऊ विमानं तैनात केली आहेत. सॅटेलाईटच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या फोटोंमध्ये नाटो राष्ट्र असणाऱ्या नॉर्वेच्या सीमेजवळ ही लढाऊ विमानं तैनात असल्याचं दिसत आहे. चिंतेची बाब अशी, की आधी ही विमानं रशियाच्या सीमेच्या आत उभी होती, आता मात्र त्यांची जागा बदलण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील सॅटेलाईट तळावरून आलेल्या माहितीनुसार नॉर्वेच्या (Norway) सीमेनजीक असणाऱ्या कोल्स्की द्वीपावर तयार करण्यात आलेल्या रशियाच्या (Russia) हवाई तळावर ओलेन्या येथे TU-160 श्रेणीची 7 आणि TU-135 श्रेणीची 4 विमानं तैनात आहेत. TU-160  या विमानात एकदाच इंधन भरल्यानंतर ते 2 मॅकच्या अतीप्रचंड वेगानं 7500 मैलांपर्यंत कुठेही न थांबता उड्डाण भरु शकतं. 


अधिक वाचा : भारताची भीती की आणखी काही? कोहिनूर हिऱ्याबाबत British Royal Family चा मोठा निर्णय


रशियायकडे असणारं हे सर्वात मोठं लढाऊ विमान आहे. ज्यामध्ये एकाच वेळी कमी अंतराची 12 अण्वस्त्र नेता येऊ शकतात. यापूर्वी रशियाची ही अण्वस्त्र वाहू विमानं एकाच तळावर तैनात होती. पण, आता मात्र त्यांचं स्थान बदलताना दिसत आहे. 


संरक्षण तज्ज्ञांच्या माहितीनुसार नाटो राष्ट्रांच्या सीमेनजीक रशियाची ही तयारी पाहता पाश्चिमात्य देशांसाठी हा एक इशारा आहे. अमेरिकेसह युक्रेनचा पाठींबा देणाऱ्या इतरही राष्ट्रांना रशिया सतर्क करताना दिसत आहे. रशियाकडून अण्वस्त्र हल्ल्यांची ठिणगी पडताच संपूर्ण जगाला याची झळ सोसावी लागणार आहे ही बाब नाकारता येणार नाही.