मुंबई : मायक्रोसॉफ्टचे  (Microsoft) सह-संस्थापक बिल गेट्स (Bill Gates) आणि त्यांची पत्नी मेलिंडा यांनी आपले 27 वर्षांचे नातेसंबंध संपवले आहेत. दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स (Melinda Gates) यांनी एका निवेदनात म्हटले आहे की आम्ही आमचे विवाहसंबंध संपविण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला वाटते की आपण आयुष्याच्या या टप्प्यावर आलो आहोत, जे आता आपण एकत्र पुढे जाऊ शकत नाही.


 Tweet करत दिली माहिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिल गेट्स यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “आम्ही आमच्या नात्यावर खूप विचार केला आहे. शेवटी आम्ही हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही एकत्र पुढे जाऊ शकत नाही. आम्हाला दोघांनाही आमची गोपनीयता वेगळी पाहिजे आहे आणि जीवनाच्या नवीन टप्प्यात जायचे आहे.



अशी झाली त्यांची  भेट


घटस्फोटानंतर बिल आणि मेलिंडा गेट्स यांचे आर्थिक संबंध कसे असतील याविषयी फारशी माहिती समोर आली नाही. मात्र, दोघे परोपकारी कामात गुंतलेल्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन या संस्थेचे विश्वस्त आहेत. 2000 मध्ये ही संस्था स्थापन केली. बिल आणि मेलिंडाची 1987 मध्ये मायक्रोसॉफ्ट येथे भेट झाली. मेलिंडा प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून कंपनीत रुजू झाली. बिझिनेस डिनरच्या निमित्ताने दोघांमध्ये संवाद झाला आणि नंतर त्यांच्यात मैत्री होत गेली आणि नातेसंबंधात ते आलेत.


लसीबाबत वादग्रस्त विधान


त्यांनी संबंध संपवण्याच्या घोषणेपूर्वी बिल गेट्स यांनी लस आणि विकसनशील देशांबद्दल वादग्रस्त विधान केले. स्काई न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बिल गेट्सना विचारण्यात आले होते की, बौद्धिक संपत्ती कायदा बदलणे शक्य आहे का, जेणेकरुन कोविड लसीचे सूत्र सामायिक करू शकतील. त्यास उत्तर देताना बिल गेट्स म्हणाले, 'कोरोना लस फॉर्म्युला विकसनशील देशांना देण्यात येऊ नये. यामुळे विकसनशील आणि गरीब देशांना काही काळ थांबावे लागेल, परंतु त्यांना लस सूत्र उपलब्ध होऊ नये.