लंडन : सायकल वेगाने चालवता येऊ शकते. पण ती कारला हरवू शकत नाही हा तुमचा आमचा समज आहे. पण आता तो जमाना गेला. ताशी १७४ किलोमीटर वेगाने सायकल चालवून इंग्लंडमधील नील कॅम्पबेल या सायकलपटूने नवा विश्वविक्रम केला आहे. इंग्लंडमधील नॉर्थ यॉर्कशायरच्या एका विमानाच्या धावपट्टीवर वेगाने सायकल चालवण्याचा हा विक्रम करण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नील कॅम्पबेल या सायकलपटूने त्याची सायकल एका कारच्या मागे बांधली. त्यानंतर कार वेगाने पळवण्यात आली. ताशी १७४ किलोमीटरचा वेग गाठल्यानंतर कार आणि सायकल वेगळ्या झाल्या. विशिष्ट वेग गाठल्यानंतर नीलने ज्या कारची सुरुवातीला वेग गाठण्यासाठी मदत घेतली होती. तिलाही मागे टाकले. २८ वर्षापूर्वी म्हणजेच १९९५मध्ये एका सायकलपटूने १६८ किलोमीटर वेगाने सायकल चालवण्याचा विक्रम केला होता. हा विक्रम नीलने मोडीत काढला.


हा विक्रम केल्यानंतर सायकलपटू नील कॅम्पबेल आनंद व्यक्त केला आहे. ही सगळी माझ्यासोबतच्या टीमची कमाल आहे. मी खूप आनंदी झालो. एवढे कधी करेन असे वाटले नव्हते. वातावरणाचाही मला फायदा झाला. जेव्हा चाचणी घेतली तेव्हा फायदा झाला.