मुंबई : पाकिस्तान (Pakistan) संसदेत  मंगळवारी अराजकता दिसून आली. पाकिस्तान संसदेत (Pakistan Assembly) अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. ही 'राष्ट्रीय संसद आहे की बाजार' अशी परिस्थिती दिसून आली. खासदारांनी एकमेकांवर फाईल्स भिरकावल्या. शिव्या, आरडाओरड अन् एकमेकांवर धावून जाण्याचा प्रकार अवघ्या जगाने पाहिला. तसेच हा सारा संसदेमधील गोंधळ पाकिस्तानी जनतेने वृत्तवाहिन्यांवर आंखों देखा हाल पाहिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानच्या (Pakistan) संसदेत एका विषयावर जोरदार चर्चा सुरु होती. मात्र, चर्चेनंतर पाकिस्तानचे (Pakistan) नॅशनल असेंब्लीचे सदस्य अली नवाज अवान यांनी एकामागून एक इतर खासदारांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जरी पाकिस्तानच्या संसदेत अशा भाषेचा वापर करण्याचे हे पहिले प्रकरण नाही. मात्र, संतप्त खासदारांनी टोकाची भूमिका घेत आलेल गैरवर्तन सुरुच ठेवले. संसदेत विरोधकांची जीभ घसरली आणि पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना चक्क गाढव म्हटले. Donkey राजाचे सरकार आम्हाला चालणार नाही, असे म्हणत जोरदार हंगामा केला.


या गोंधळाच्यावेळी नवाज अवान यांनी विरोधी पक्षनेत्याकडे प्रश्न-उत्तराची प्रत फेकली आणि त्यानंतर अधिकच गोंधळात भर पडली. त्यानंतर शिवीगाळ आणि जोरदार घोषणाबाजी संसदेत दिसून आली. एकमेकांवर फाईल्स भिरकावल्या जात होत्या. पाकिस्तानमधील कनिष्ट सभागृह म्हणजेच नॅशनल असेंबलीमध्ये प्रचंड गोंधळ झाल्याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. 


पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार संसदेच्या कनिष्ट सभागृहात पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय आणि विरोधी पक्षातील खासदारांनी एकमेकांना फाईल्स फेकून मारल्या. यावेळी जोरदार आरडाओरड करण्यात येत होती. धक्कादायक बाब म्हणजे महिला खासादारांसमोरच हा शिवीगाळी प्रकार सुरु होता. पाकिस्तानी संसदेमध्ये महिला लोकप्रितिनिधींसमोरच खासदार एकमेकांबद्दल अपशब्दाचा वापर करताना दिसून आले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर सुरक्षारक्षकांना पाचारण करण्यात आले.



दरम्यान, सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी खासदार अब्दुल मजीद खान नियाझी महिला खासदारांसह काही विरोधी खासदारांची खिल्ली उडवताना दिसू आलेत. अब्दुल मजीद खान नियाझी यांच्यासह त्यांचे सहकारी खासदार विरोधी पक्षातील नेत्यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
 
'द डॉन' या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान संसदेच्या कनिष्ट सभागृहामध्ये अर्थसंकल्पावरुन हा वाद उफाळला. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे धाकटे बंदू शहबाज शरीफ हे सभागृहाला संबोधित करत होते. मागील आठवड्यामध्ये इम्रान खान सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पासंदर्भात शहबाज शरीफ बोलत होते. मात्र त्याचवेळी सत्ताधारी इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे खासदार अली अवान आणि एका विरोधी पक्षाच्या खासदाराने आरडाओरड सुरु केला. त्यानंतर मंगळवारी हा गोंधळ झाला.