मुंबई : शेजारील देश चीन आपल्या सवयी काही सोडत नाही. चीनचा सर्वात मोठा कट समोर आलेला आहे. जगभरात कोरोना व्हायरस परसवण्याचा आरोप चीनवर लावण्यात आला आहे. याच चीनने भारतातील कोरोना व्हॅक्सीन तयार करणाऱ्या कंपन्यांना निशाण्यावर घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिनी हॅकर्स ग्रुपने लस बनवणा-या दोन भारतीय कंपन्यांवरही सायबर अटॅक केला आहे. काही आठवड्यांपूर्वीच हा हल्ला करण्यात आला. चीनी कंपनी स्टोन पांडानं सिरम आणि भारत बायोटेकच्या आयटी सिस्टिममधल्या (Serum Institute of India) आणि (Bharat Biotech  त्रुटी शोधून हा हल्ला केला आहे. सिंगापूरच्य़ा सायफर्मा या सायबर गुप्तचर कंपनीनं हा दावा केला आहे. मात्र याबाबत खुद्द सिरम आणि भारत बायोटेकनं मौन बाळगलं आहे.  


हॅकर्सने आयटी सिस्टमवर साधला निशाणा 


सायबर इंटेलिजेंस फर्म सायफर्मा (Cyfirma) ने न्यूज एजन्सी रॉयटर्सला सांगितलं की,'चीनी सरकार समर्थित हॅकर्सने या आठवड्यात दोन भारतीय व्हॅक्सीन निर्मात्यांना आयटी सिस्टमवर निशाणा साधला आहे.' भारत आणि चीनी दोघांनी अनेक देशात कोविड-19 ची व्हॅक्सीन विकले आणि गिफ्ट दिले आहेत. भारतने आता जगभरात विकणाऱ्या सर्व लसींचे 60 टक्क्यांहून अधिक उत्पादन केलं आहे. (अण्वस्त्रांची चाचणी घेण्याची क्षमता विकसीत करण्याचे चीनचे प्रयत्न) 



तसेच अत्याधुनिक अण्वस्त्रे तयार करून त्यांची भूमिगत केंद्रांवरून चाचणी घेण्याची क्षमता विकसीत करण्यासाठी चीनचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत असा दावा अमेरिकेतील तज्ज्ञाने केला आहे. त्यासाठी उपग्रहांकडून मिळालेल्या फोटोंचा अभ्यास सुरू झाला आहे.  भूमिगत केंद्रांवरून अण्वस्त्रांची चाचणी घेण्याची क्षमता विकसीत करण्याचे चीनचे प्रयत्न आहेत.


हान्स क्रिस्टन्सन हे अनेक वर्षांपासून अमेरिका, रशिया आणि चीनच्या आण्विक क्षमतांचा अभ्यास करत आहेत. चीनमधील क्षेपणास्त्र प्रशिक्षण तळाच्या उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारे त्यांनी चीनबाबत अंदाज व्यक्त केला आहे.