अण्वस्त्र चाचणीचा प्रयोग करुन चीनची जगाला धमकी

अमेरिकेतील तज्ज्ञांनी केला दावा 

Updated: Mar 2, 2021, 03:33 PM IST
अण्वस्त्र चाचणीचा प्रयोग करुन चीनची जगाला धमकी

मुंबई : अत्याधुनिक अण्वस्त्रे तयार करून त्यांची भूमिगत केंद्रांवरून चाचणी घेण्याची क्षमता विकसीत करण्यासाठी चीनचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत असा दावा अमेरिकेतील तज्ज्ञाने केला आहे. त्यासाठी उपग्रहांकडून मिळालेल्या फोटोंचा अभ्यास सुरू झाला आहे.  भूमिगत केंद्रांवरून अण्वस्त्रांची चाचणी घेण्याची क्षमता विकसीत करण्याचे चीनचे प्रयत्न आहेत.

हान्स क्रिस्टन्सन हे अनेक वर्षांपासून अमेरिका, रशिया आणि चीनच्या आण्विक क्षमतांचा अभ्यास करत आहेत. चीनमधील क्षेपणास्त्र प्रशिक्षण तळाच्या उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांच्या आधारे त्यांनी चीनबाबत अंदाज व्यक्त केला आहे. (मुंबईतील ब्लॅक आऊटचा कट उघडकीस आल्याने चीन हडबडला, अशी प्रतिक्रिया आली समोर)

एकीकडे भारत चीन यांच्यात सीमावाद काहीसा निवळत असताना चीनचे नवे चाळे पुन्हा उघड व्हायला सुरूवात झाली आहे. प्रत्यक्ष सीमेपासून ते सायबर हल्ल्यांपर्यंत चीनने भारताला त्रास द्यायचा चंग बांधल्याचं दिसून येतंय. पूर्व लडाखमध्ये सिंथेटिक अपर्चर रडारनं देप्सांग परिसरात काही दृश्यं टिपली आहेत. यात चीनकडून एलएसीजवळ बांधकाम करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

ऑक्टोबरमध्ये मुंबईत झालेल्या ब्लॅकआऊटमागे चीनचा हात 

नव्या फोटोतून चीननं चौकीजवळ कायमस्वरूपी बांधकाम केल्याचं दिसत आहे. २५ फेब्रवारीला सॅटेलाईटद्वारे हे फोटो घेण्यात आलेत. तर चिनी हॅकर्सनी भारताच्या लसीकरण कार्यक्रमावरही वक्रदृष्टी टाकलीय. लस बनवणाऱ्या कंपन्या चिनी हॅकर्सच्या रडारवर असल्याचं समोर येतंय. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईत झालेल्या ब्लॅकआऊटमागे चीनचा हात असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

चीननं सायबर हल्ला करून मुंबई अंधारात बुडवली, या न्यूयॉर्क टाइम्सच्या दाव्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही दुजोरा दिला आहे. सायबर समितीच्या अहवालातही ही बाब स्पष्ट झाली आहे.पूर्व लडाखमध्ये चीनने पुन्हा कुरावती काढायला सुरूवात केलीय. सॅटेलाईट इमेजेसमधून चीनचा नवा डाव उघड झाला आहे. . देप्सांगपासून २५ किमी अंतरावरील चौकीचा केला विस्तार करण्यात आला आहे. . गलवान व्हॅलीतल्या संघर्षानंतर चीनने चौकीचा विस्तार केलाय. सिंथेटिक अपेर्चर रडारनं देप्सांग परिसरात काही दृश्य टिपली असून, यात चीनकडून एलएसीजवळ बांधकाम करण्यात आल्याचं समोर आलं आहे.