नवी दिल्ली : चीन पुन्हा एकदा भारत विरोधी कटकारस्थान रचतो आहे. या बाबतचा खुलासा एका सॅटेलाईट फोटोमधून झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोकलामच्या उत्तर भागात चीनी सैनिक ७ हॅलीपॅड बनवत आहे. यासोबतच तेथे हवेतच पाडले जाणारे मिसाईल, टँक्स, आर्म्ड व्हेईकल्स, ऑर्टिलरी यासह अनेक लष्कराच्या गोष्टी दिसत आहेत.


चीन तेथे रस्ता बनवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. आर्मी चीफ जनरल बिपिन रावत यांनी बुधवारी रायसीना डायलॉगमध्ये म्हटलं होतं की, 'दोन्ही देशामधील संबंध डोकलाम वादानंतर पुन्हा आधीसारखो झाले आहेत. आता कोणतीही समस्या नाही. उत्तर डोकलाममध्ये खूप कमी प्रमाणात सैन्य आहे. ठंडीमुळे ते वस्तू घेऊन गेले नसतील. भारतीय सैन्य देखील तेथे आहे.  चीनी सैन्य जर परत येतं तर आम्ही त्यांचा सामना करु.'


मीडिया रिपोर्ट्सनुसार उत्तर डोकलाम भागात पुन्हा एकदा चीनी सैन्य कॅम्प बनवत आहेत. या भागात रस्ता बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यामुळे तेथे पोहोचणं सोपं होऊन जाईल.


नव्या सॅटेलाईट फोटोनुसार ये स्पष्ट दिसतं आहे की, चीन कशाप्रकारे त्या भागात मिलिट्री कॅम्प बनवत आहे. ज्या भागावर भूटानचा दावा आहे. त्या भागात चीन हे काम करत आहे. हा पूर्ण भाग जवळपास 10 वर्ग किलोमीटरपर्यंत पसरला आहे.