Child Washes Laptop with Soap Water: लहान मुलं कायमच मस्ती करतात हे आपल्याला माहिती आहेच. पण कधीकधी त्यांची मस्ती सिरियसलीही घेतली जाते. आई घरात असेल तर नेहमीच लहान मुलांना ओरडते तर कधी लहान मुलांच्या चुकीवर आई वडिल पांघरूणही घालतात. हल्ली लहान मुलांचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर (Viral Videos on Social Media) व्हायरल होत असतात. अनेकदा सोशल मीडियावर लहान मुलांनी केलेली मस्ती खळबळ निर्माण करते. नुकताच एका मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता त्या व्हिडीओत त्याने कारच्या बॉडीला लिपस्टिकने रंगवायला सुरुवात केली होती आता असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये एक लहान मूलगी साबण आणि पाण्याने महागडा लॅपटॉप (Laptop Price today) धुताना दिसत आहे. लॅपटॉप पाण्यानं धुणं ही काही सोप्पी गोष्टी नाही. तुमचा लॅपटॉप खराबही होऊ शकतो पण हा व्हिडीओ पाहताच तुम्हीही त्या मुलीचं कौतुक कराल. (Chinese toddler washes father's laptop with soap video goes viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ फेसबुकवर एका यूजरने शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ चीनमधील (China) एका शहरातील आहे. एका लहान मुलाला तिच्या वडिलांच्या लॅपटॉपवर कचरा आणि काही घाण दिसली. त्यानंतर तो कसा स्वच्छ करायचा यावर त्या मुलीनं शक्कल लढवली आणि हा व्हिडीओ पाहून तुम्हीच पाहा तिनं काय केलं ते. 


हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य



मुलीनं प्रथम प्लास्टिकचा टब पाण्याने भरला आणि नंतर त्यात साबण मिसळून संपूर्ण लॅपटॉप (How to clean your laptop) साफ केला. एवढेच नाही तर साफसफाई केल्यानंतर तिनं लॅपटॉप पुन्हा पाण्याने स्वच्छ केला. आपण हा घाण झालेला लॅपटॉप स्वच्छ करू आणि ते पाहून आपल्या वडिलांना आनंद होईल असा विचार तिनं केला पण तसं काही झालं नाही. 


हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?


व्हायरल व्हिडीओमध्ये लहान मूल ही साफसफाई करताना दिसते नाही. यादरम्यान कोणीतरी त्याचा व्हिडिओही बनवला आहे. आता हा व्हिडिओ आनंदात बनवला आहे की रागात हे माहित नाही पण हा व्हिडिओ नक्कीच व्हायरल होत आहे.