Walt Disney World देखील कोरोनाचा फटका
कोरोना व्हायरसचा पर्यटनक्षेत्राला मोठा फटका
मुंबई : डिस्ने टुरिझमच्या व्यवसायाला देखील कोरोना व्हायरसचा (coronavirus) फटका बसला आहे. डिस्ने कंपनीने (Disney Company) वॉल्ट डिस्ने वर्ल्ड (Walt Disney World) काही दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतीक साथीचा रोग म्हणून घोषित झालेल्या कोरोना व्हायरसमुळे फ्लोरिडा येथील हे थिम पार्क बंद करण्यात आलं आहे. जगभरात पसरलेल्या या कोरोना व्हायरसचं सावट हे पर्यटनावर देखील आहे.
कंपनीने डिस्नेलँड पॅरिस आणि डिस्नेचे इतर सर्व ऑफिस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरूवारी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने कॅलिफोर्नियामधील ऑयकॉनिक डिझनीलँड रिसॉर्ट बंद केलं आहे. कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. असं असताना या व्हायरसने एशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेमध्ये असलेल्या 11 डिझनी थिम पार्कचे गेट बंद केले आहेत.
डिस्ने पार्कमध्ये येणाऱ्या असंख्य पर्यटकांचा आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा विचार करता आम्ही हा निर्णय घेतला आहे. फ्लोरिडा येथील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड रिसॉर्ट आणि डिस्ने पॅरिस रिसॉर्ट बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. 15 मार्चपासून हा निर्णय लागू होणार आहे, अशी माहिती डिस्नेचे प्रवक्तांनी दिली आहे. (भारतात कोरोनाची लागण झालेला पहिला रूग्ण एकदम ठणठणीत)
वॉल्ट डिस्ने वर्ल्डमधील मॅजिक गार्डन हे अतिशय लोकप्रिय थिम पार्कपैकी एक आहे. 2018 च्या माहितीनुसार वर्षभरात तब्बल 20 मिलियन म्हणजे 20 कोटी पर्यटक या थिम पार्कला भेट देतात. या थिमपार्कमध्ये कंपनीने करोडो रुपयांची गुंतवणूक केली आहे.
वॉल्ट डिस्ने वर्ल्ड हे फक्त लहानांचच नाही तर मोठ्यांच देखील आकर्षणाचं पर्यटन स्थळ आहे. याठिकाणी एकदा तरी जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. आता परिक्षांचा कालावधी आहे. परिक्षा संपल्या की अनेक पर्यटक या थिमपार्कला भेट देतात. पण यावेळी कोरोनाचं संकट पाहता थिम पार्क बंद ठेवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.