मुंबई : कोरोना व्हायरसचं थैमान रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोलमडली असली तरीही नैसर्गिक व्यवस्था मात्र अतिशय सुरळीत सुरू आहेत. लॉकडाऊनचा फायदा हाँगकाँगच्या ओशन पार्कमधील पांडांना झाला आहे. या दोघांच तब्बल १० वर्षांनी मिलंन झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेबी पांडा झूमध्ये येणार असल्यामुळे तिकडे केअर टेकर आनंदात आहेत. सोमवारी सकाळी पांडा यिंग यिंग आणि पांडा ले ले यांना लॉकडाऊनमुळे संभोग करण्याची संधी मिळाली. गेल्या कित्येक वर्षांपासून माणसांच्या गर्दीमुळे पांडांना ही संधी मिळत नव्हती. लॉकडाऊनमुळे पार्क पुर्णपणे बंद असल्यामुळे रहदारी नाही. या संधीचा फायदा घेतला आहे. 



पार्कने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, २०१० पासून हे दोघं मिलनाचा प्रयत्न करत होते. पण ते कधी यशस्वीरित्या झालं नाही. पण लॉकडाऊनच्या काळात माणसांची वरदळ नाही फक्त केअरटेकर असल्यामुळे यांना या संधीचा फायदा झाला. 


ओशन पार्कचे कार्यकारी संचालक मिशेल बोस यांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्कमधील स्टाफ बेबी पांडाच्या आगमनासाठी खूप उत्सुक आहे. एवढंच नव्हे तर नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा राहिल्यामुळे याचा आनंद सर्वाधिक आहे. कारण वैद्यकीय पद्धतीने गर्भधारणा राहिल्यास त्याची शाश्वती कमी असते. 



पांडाच्या मिलनाचा काळ हा मार्च ते मे असा असतो. याच दरम्यान या दोघांचा संभोग झाल्यामुळे स्टाफ आनंदी आहे. पांडाच्या हार्मोन्समधील बदलावर कायमच केअर टेकरच लक्ष असतं. यामुळे त्यांच्यातील मिलन कधी होऊ शकतं याची ते शक्यता वर्तवू शकतात. 


मार्च महिन्याच्या अखेरीपासूनच यिंग यिंग आणि ले ले यांच्यात फ्लर्टिंग होतोना पाहिलं. ले ले यिंग यिंगला आपल्याकडे आकर्षित करत होती. पाण्यात खेळून झाल्यानंतर यांच्यात संभोग झाल्याचं पाहायला मिळाला. 


पांडा मादीची गर्भधारणा ही बाळाच्या जन्माच्या १४ ते १७ दिवसांपूर्वी अल्टासाऊंडद्वारे ओळखता येते. गर्भधारणा १० महिन्यांपर्यंत टिकू शकते, म्हणून प्राणीसंग्रहालयातील कर्मचार्‍यांना याकरता वाट बघावी लागू शकते. सगळ्यांना आशा आहे की, ओशन पार्कमध्ये यंदाच बेबी पांडाच आदमन होईल.