Coronavirus in China : चीनवर कोरोना मोठे संकट उभे राहिले आहे. (Coronavirus) कठोर निर्बंध लादूनही संकट कमी होताना दिसत नाही. दोन महिन्यांपूर्वी, चीन सरकारने आपल्या शून्य-कोविड धोरणात संपूर्ण बदल केला आणि त्यानंतर लाखो लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे धक्कादायक आकडेवाडीवरुन दिसून आले. (A million infections and 5,000 deaths a day from Covid in China:Report)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाखो लोक कोरोनाच्या संसर्गाला बळी पडले आहेत आणि पडत आहे. कोरोनाचा धोका लक्षात व्यवस्था करण्यात आली. मात्र, अचानक रुग्णसंख्येत वाढ झाल्याने रुग्णालये आणि स्मशानभूमींवर जास्त भार पडला आहे. कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक पाहायला मिळत आहे. कोविड रुग्णांच्या मृत्यूची वाढ होताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे दिवसाला सुमारे 5000 लोकांचा मृत्यू होत असल्याची आकडेवारी हाती आली आहे. (5000 deaths a day in China) एका रिपोर्टमध्ये तसे म्हटले आहे. यावरुन चीनमधील कोरोनाची स्थिती किती भयावह असल्याचे दिसून येत आहे.


मागील दोन वर्षांपूर्वी जगाने कोविड-19चे संकट पाहिले. आता तर चीन मोठ्या प्रमाणात या संकटाला सामोरा जात आहे. सर्वात वाईट COVID-19 उद्रेकांपैकी एकाशी झुंज चीन देत आहे. चीनचा धोका कमी होण्याचे नाव घेत नाही. Omicron subvariant BF.7 च्या उदयादरम्यान आशियाई देश आपली बहुतेक कोविड धोरणे पुन्हा अवलंबित आहे.  कोरोना व्हायरसमुळे अनेक देशात दररोजच्या प्रकरणांची संख्या वाढत आहे. नवीन विश्लेषणानुसार, चीनमध्ये दररोज दहा लाखांहून अधिक नवीन संसर्ग आणि किमान 5,000 मृत्यूची नोंद होत आहे. 


ब्रिटीश वैज्ञानिक माहिती आणि विश्लेषण कंपनी एअरफिनिटीच्या म्हणण्यानुसार,  या सध्याच्या कोविड लाटेमुळे जानेवारीमध्ये देशातील दैनंदिन केस रेट 3.7 दशलक्षपर्यंत वाढू शकतो, असे ब्लूमबर्गने गुरुवारी सांगितले. हे संशोधन लंडन स्थित फर्म- एअरफिनिटी द्वारे आयोजित केले गेले होते. त्यांनी असा अंदाज वर्तवला होता की परिस्थिती आणखी वाईट होण्याची अपेक्षा आहे आणि सध्याच्या लाटेमुळे जानेवारीमध्ये प्रकरणे जवळजवळ 3.4 दशलक्ष पर्यंत वाढू शकतात ते मार्चमध्ये 4.2 दशलक्ष पर्यंत पोहोचू शकतात. 


बुधवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, डिसेंबरच्या सुरुवातीपासून चीनमध्ये जवळपास 3,000 प्रकरणे आणि 19 पेक्षा कमी मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, दुसरीकडे आशियाई देशातील रुग्णालयात सध्या दररोज दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने चिंता वाढवली आहे.चीनने सामूहिक चाचणी थांबवली आहे आणि यापुढे लक्षणे नसलेल्या प्रकरणांची नोंद केली जात नाही. या संयोजनाचा अर्थ असा आहे की अधिकृत डेटा देशभरात उद्भवलेल्या प्रादुर्भावाचे खरे प्रतिबिंब असण्याची शक्यता नाही, असे एअरफिनिटीचे लस आणि महामारीविज्ञान प्रमुख डॉ लुईस ब्लेअर म्हणाले.