COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Viral News : लग्न म्हटलं की दोन जीवाच मिलन असं म्हणतात. त्यासोबत दोन कुटुंबाचा हा सोहळा असतो. आजकालच्या युगात बोलयचं झालं तर दोन् कुटुंबात नवीन सदस्याची एन्ट्री होते. सूनेच्या रुपात मुलगी आणि जावयाचा रुपात मुलगा मिळतो. सासू सूनेचं नात तसं बदनामच...पण काळ बदलाय आहे. आता सून ही पण मुलगी असते. एका लग्नाची अजब गोष्ट समोर आली आहे. सासू आपल्या लेकासाठी सून आणायला गेली आणि हे काय तिला कळलं की, ही आपली हरवलेली मुलगी आहे. आता मुलगा आणि मुलीचे लग्न कसं होणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना...यात पण एक  ट्विस्ट आहे. कुठे घडला हा विचित्र प्रकार आणि पुढे नेमकं काय झालं पाहूयात. 


सून निघाली मुलगी!


ही घटना चीनमधील एका लग्नात घडली. होणारी सून ही मुलगी असल्याच सासूला कळल्यानंतर त्याला जबरदस्त धक्का बसला. लेकाच लग्न म्हटलावर वरमाय अगदी आनंदात होती. घरात एक सूनेच्या रुपात मुलगी येणार सर्वत्र आनंदाच वातावरण होतं. वाजतगाजत वरात नवरी मुलगीकडे पोहोचली. तिथेही लग्नाची लगबग सुरु होती. जशी वरात सूनेच्या दारी पोहोचली तशी होणारी सून सासू आणि नवरदेवाच्या स्वागतासाठी स्वत: हजर झाली. त्यावेळी होणारी सून पाहून सासूच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण त्यावेळी वरमायाच लक्ष वधूचा हातावरील एका खूणकडे गेलं. त्यावरुन सासूला काही भूतकाळातील गोष्ट आठवली. 


'ही तर आम्हाला...'


सासूने सूनेच्या घरातील मंडळींना तिच्याबद्दल विचारपूस सुरु झाली. त्यानंतर अनेक धक्कदायक खुलासे झाले. लग्नाच्या दिवसापर्यंत सासूला आपल्या सूनेच हे सत्य माहिती नव्हतं. नवरीच्या आई वडिलांनी सांगितलं की, त्यांना ही मुलगी रस्त्याच्या कडेला सापडली होती. त्यानंतर आम्ही तिला दत्तक घेतलं आणि लहानचं मोठं केलं. त्यानंतर वरमायाने 20 वर्षांपूर्वी आपली मुलगी हरवली होती आणि ती मुलगी हेच आहे, तिच्या जन्म खूणावरुन ही सिद्ध होतं. ते कळल्यावर सगळ्यांना एकच धक्का बसतो. खास करुन नवरी मुलगी आणि मुलगा यांना. होणारी सासू आली आई आहे. आनंदाची बातमी सोबत आता लग्न कसं होणार हा प्रश्न होता. पण थांबा ही कहाणी इथेच संपत नाही. यानंतरही त्या दोघांचं लग्न झालं. 


'कहानी में ट्विस्ट'


झालं असं की, या दोन्ही कुटुंबाने एकमेकांपासून काही गोष्टी लपवल्या होत्या. जसी नवरी मुलगी ही त्या कुटुंबातील दत्तक मुलगी होती. तशीच नवऱ्या मुलाच्या आईने आपली मुलगी हरवल्यानंतर एक मुलगा दत्तक घेतला होता. तोच हा नवरा मुलगा होता. अखेर दोघांनाही दत्तक घेतले असल्याने त्यांच्यात पूर्वीचे कोणतेही नाते नव्हते ही निश्चित झाले आणि मग या दोघांचे लग्न मोठ्या थाट्या माट्यात लावण्यात आले.