मुंबई : फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने दाऊद आणि त्याची पत्नी महजबीन कोरोना पॉझिटीव्ह नसल्याचं म्हटलं आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर दाऊद इब्राहिम कोरोना पॉझिटीव्ह झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. दाऊदला सैन्याच्या रुग्णालयात दाखल केल्याचं देखील बोललं जात होतं. पण आता त्याच्या भावाने याबाबत हा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाऊदचे सुरक्षा रक्षक आणि घरातील इतर लोकांना क्वारंटाईन केल्याचं देखील बोललं जात होतं. पण न्यूज़ एजेंसी आयएनएसच्या माहिती नुसार, अनीसने म्हटलं की, त्याचा भाऊ हा कोरोना पॉझिटीव्ह नाही. तो आपल्या घरीच आहे. 


कोण आहे दाऊद इब्राहिम?


मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दाउद इब्राहिम पाकिस्तानमध्ये लपून बसला आहे. पाकिस्तान मात्र तो त्यांच्या देशात नसल्याचं सांगत आला आहे. भारताने अनेकदा पुरावे देवूनही पाकिस्तान हे लपवत आला आहे.


1993 मुंबई बॉम्बस्फोटचा दाऊद हा मास्टरमाइंड होता. त्यानंतर तो देश सोडून पळून गेला होता. दाऊद पाकिस्तानात आहे. पण तो लोकांच्या समोर येत नाही. याआधी देखील दाऊद आजारी असल्याच्या बातम्या आल्या होत्या.