न्यू जर्सी : व्यसन आपल्या शरीरालाच घातक ठरते असे नाही तर खिशासाठीही खूप भारी असू शकते याची प्रचिती अमेरिकेत एका व्यक्तीला आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यू जर्सी मध्ये राहणारा केनी बॅकमन या व्यक्तीने दारूच्या नशेत कॅब बुक केली. 'नई दुनिया वेबसाईट'ने यासंदर्भातील वृत्त आहे.


ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत असून या घटनेची चर्चा सगळीकडे रंगली आहे. ही चर्चा खरी मानली तर जेव्हा त्याची नशा उतरली तेव्हा केनी हा ५०० किमी दूर आला होता.


त्याचे भाडे १६०० डॉलर म्हणजेच १ लाख ३ हजार ८९६ रुपये झाले. सध्या केनी हा पैसे चुकते करण्यासाठी लोकांकडून डोनेशन मागतोय. यासाठी 'GoFundMe'वर जाऊन पैसे भरण्याचे आवाहन करतोय.


५०० किमी अंतर पुढे 


गेल्या शुक्रवारी, २१ वर्षाचा केनी वेस्ट व्हर्जिनियातील आपल्या मित्रांसह पार्टी करत होतो.


त्यानंतर वेस्ट व्हर्जिनिया विद्यापीठात जाण्यासाठी उबेर कॅप बुक केली. दारू प्यायल्याने तो टॅक्सीत झोपला. दोन तासांनंतर जेव्हा त्याला जाग आली तेव्हा तो विद्यापीठ परिसरापासून सुमारे ५०० किमी अंतर दूर पोहोचला.


सांगितलं तिथेच सोडलं


जिथे जाण्यास सांगितले तिथे पोहोचविल्याचे टॅक्सी कंपनीतर्फे सांगण्यात आले. त्याने ड्रायव्हरला ट्रिपसाठी ५ स्टार रेटिंग देखील दिली.


आतापर्यंत, कैनीने १६०० डॉलरपैकी १३५ डॉलर्स दिले. बाकीची रक्कम तो लोकांकडून मागत आहे.


नेमका पत्ता दिला नव्हता 


कॅब बुक करताना आपण राहण्याचा नेमका पत्ता दिला नसल्याचे केनीनने सांगितले. इथे कसे पोहोचलो आपल्याला माहित नाही असे तो सांगतो.


पण चुक तर झाली आहे म्हणून भरपाई करण्याच्या तो प्रयत्नात आहे.