मेक्सिको : मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमध्ये आलेल्या भूकंपात १३८ जणांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपात प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनातर्फे बचावकार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय वेळेनुसार रात्री ११. ४५ वाजता हा प्रलंयकारी भूकंप झाला. या भूकंपामुळे तब्बल ४४ इमारती जमीनदोस्त झाल्याचं मेक्सिकोच्या गव्हर्नरांनी सांगितलं. भूकंपाचा केंद्रबिंदू मेक्सिकोपासून प्यूब्ला राज्यातील चियाउतला डी तापियापासून सात किलोमीटर पश्चिमेला होता.


भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले असल्याची भीती मेक्सिकोच्या गव्हर्नरांनी व्यक्त केली आहे. या भूकंपानंतर मेक्सिको शहर विमानतळावरील सर्व विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 


अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, य भूकंपाचा केंद्रबिंदू ५१ किलोमीटर खाली होता. एकट्या मोरलियोस राज्यात ५४ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर पुएब्लोमध्ये २६ लोक मृत्यूमुखी पडले आहेत.