Elon Musk On Gender Reassignment Surgery: टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी लिंग बदलासंदर्भात मोठं विधान केलंय. लिंग बदलण्याच्या सर्जरीमुळे माझा मुलगा माझ्यापासून कायमचा दुरावल्याचे दु:ख मस्क यानी बोलून दाखवले. अमेरिकेतील मुलाखतकार जॉर्डन पीटरसन यांना दिलेल्या मुलाखतीत एलॉन मस्क बोलत होते. लिंग बदलण्याची सर्जरी प्रत्यक्षात मुलांची हत्या आणि नसबंदी केल्याप्रमाणे असते. हा एक व्हायरस आहे, असे ते म्हणाले. कोरोना काळात मला फसवून माझ्याकडून मुलाचे जेंडर बदलण्यासंदर्भात फॉर्मवर सही करुन घेण्यात आली. काय होणार आहे? हे मला माहिती नव्हतं.त्यावेळी कोरोनामुळे मी आधीच संभ्रमित होतो. माझा मुलगा सुसाइड करणार आहे, असं मला सांगण्यात आलं होतं. 


'मी या व्हायरसशी लढणार'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लिंग बदलण्याच्या या सर्जरीला डेडनेमिंग म्हटलं जातं. कारण यात खरचं मुलांचा मृत्यू होतो. सर्जरीनंतर मी माझ्या मुलाला गमावलं. त्यावेळीच या व्हायरसशी लढायचं असा निर्णय मी घेतला. आम्ही यावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रान्सजेंडर वैद्यकीय उपचार हा गुन्हा घोषित व्हावा यासाठी आपण लढणार असल्याचे एलॉन मस्क यांनी जाहीर केले होते. एलन मस्तचा मुलगा जेवियर याने 2022 मध्ये 18 वर्षे पूर्ण झाल्यावर लिंग बदलले होते. यानंतर जेवियरने आपले नाव बदलून विवियन जेना विल्सन असे केले होते. 


विवियनने सर्जरीनंतर वडिलांचे नाव सोडले 


मला माझे वडिल एलॉन मस्क यांच्याशी कोणत्याही प्रकारचे नाते ठेवायचे नाही. विवियनने तिच्या नावातून मस्कहे आडनाव हटवून आईचे आडनाव लावले. मुलापासून मुलगी बनण्यासाठी अर्ज केल्याच्या एक महिन्यानंतर एलन मस्त यांनी रिपब्लिकन पार्टीला आपले समर्थन जाहीर केले होते. अमेरिकेत ट्रान्सजेंडरच्या अधिकारांवर मर्यादा आणाव्यात या रिपब्लिकन पार्टीच्या धोरणाला हे समर्थन होते. 


आयव्हीएफने 5 मुलांना जन्म 


विवियनची आई जस्टिन विल्सन कॅनडियन लेखिका आहे. 2000 साली क्वींस कॉलेजमध्ये शिकताना एलन यांच्याशी त्यांची ओळख झाली होती. यानंतर दोघांनी लग्न केले. 2008 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 2004 मध्ये या कपलने आयव्हीएफच्या माध्यमातून जुळी मुले विवियन आणि ग्रिफिन यांना जन्म दिला. 2006 मध्ये काई, सेक्सन आणि डेमियन या 3 मुलांना जन्म दिला. 


बाराव्या मुलाचे वडील 


एलॉन मस्क मागच्या महिन्यातच 12 व्या मुलांचे वडील झाले होते. त्यांची पार्टनर न्यूरालिंकची मॅनेजर शिवॉन जिलिसलने या बाळाला जन्म दिला. जगाला लोकसंख्येची चिंता आहे. चांगल्या आयक्यूच्या मुलांना जन्म द्यायला हवा. लोकांनी जास्त मुलं जन्माला घातली नाहीत तर आपली सभ्यता नष्ट होऊन जाईल, असे विधान त्यांनी 2021 साली केले होते.