Zoom Call Meeting: कोरोना काळात वर्क फ्रॉम होमचं महत्त्व अधोरेखित झालं. यामुळे कर्मचारी आणि कंपनी या दोघांना फायदा झाला. कर्मचाऱ्यांचा ऑफिसला येण्या-जाण्याचा वेळ वाचला. त्यासोबत ऑफिसच्या खर्चातही मोठी कपात दिसून आली. त्यामुळे कंपनी आणि कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम फायद्याचं ठरलं. या काळात झूम या अ‍ॅपनं मोलाची भूमिका बजावली. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांना एकत्र आणण्याचं व्यासपीठ म्हणून झूमकडे पाहिलं गेलं. पण या झूम मिटिंगद्वारे (Zoom Meeting) बॉसचे आदेश ऐकून कर्मचारीही हैराण झाले. एका महिला कर्मचाऱ्यानं खुलासा केला की, "झूम कॉलवर बॉसला आपलं घर दाखवण्यास मनाई केली. त्यामुळे बॉस मला जास्तीचं काम द्यायचा. तसेच महत्त्वाच्या मिटिंगपासून दूर ठेवायचा." आलिया नावाच्या यूजरने सोशल मीडियावर सक्रिय असते. टिकटॉकसह अनेक सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ पोस्ट करत असते. एका व्हिडीओ पोस्टमध्ये तिने याबाबतचा खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मिटिंगबाबत आलियाला कॉल आला होता. पण नेमकं तेव्हाच तिचं वायफाय बंद होतं आणि मिटिंगमध्ये हजर राहण्यास उशीर झाला. त्यानंतर तिने बॉसला टेक्स्ट मेसेज केला. तसेच वायफाय सुरु झाल्यानंतर काही मिनिटातच लॉगइन केलं. आलियानं याबाबत माफीही मागितलं आणि वायफाय बंद असल्याचं सांगितलं. त्यानंतर बॉसने तिला घर दाखवण्यास सांगितलं. तेव्हा तिने बॉसला नकार दिला.


दोन डासांनी चोरांना थेट तुरुंगात पाठवलं, पोलिसांनी गुन्ह्याची उकल कशी केली? जाणून घ्या


 "मी एक नोकरी करत होती. तेव्हा त्या कंपनीच्या कामाची मिटिंग झूम मिटिंगद्वारे व्हायच्या. तेव्हा एका मिटिंगमध्ये बॉसने मला घर दाखवण्यास सांगितलं. तेव्हा मी त्यांना स्पष्ट नकार दिला. तेव्हापासून त्याने मला महत्त्वाच्या मिटिंगमध्ये बोलवणं बंद केलं. मला दोन मोठे प्रोजेक्ट दिले आणि ते पूर्ण करण्यासाठी एका आठवड्याचा अवधी दिला", असं आलियानं लिहिलं आहे. 


आलियाने आपलं खासगी जीवन आणि नोकरी दोन्ही वेगळं असल्याचं सांगितलं आहे. या दोघांचा एकमेकांशी काही संबंध नसल्याचं तिने सांगितलं आहे. "माझ्या खासगी आयुष्याचा नोकरीशी काही एक संबंध नाही. मी दोन्ही कामं वेगवेगळी ठेवणं पसंत करते. तो वारंवार माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत विचारायचा.", असंही तिने पुढे सांगितलं.