Extramarital Affair: `या` शहरात विवाहबाह्य संबंध मानला जात नाही गुन्हा; तुम्ही कधी गेलाय का?
Extramarital Affair : प्रत्येक देशात आणि शहरात नाती जपण्यासाठी वेगवेगळे नियम आणि कायदे पाहिला मिळतात. जगाच्या पाठीवरील एका शहरात विवाहबाह्य संबंध हा गुन्हा मानला जात नाही.
Extramarital Affair : प्रेम आणि लग्न हे विश्वास त्यासोबत एकनिष्ठा यावर उभं असतं. गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधाचे प्रकरण वाढली आहेत. एक पत्नी असताना तुमचं घराबाहेर दुसरं संबंध असल्याच ते हिंदू धर्मात गुन्हा मानला जातो. जेव्हा विवाहबाह्य संबंध उघड होतात तेव्हा नवरा बायकोमधील नातं संपुष्टात येतं. आपण आपल्या आजूबाजूला किंवा अशा बातम्या पाहिल्या आहेत. विवाहबाह्य संबंधांमुळे अनेकांचे संसार तुटले आहेत. बॉलिवूडमध्ये तर असे अनेक प्रकरण आहेत. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर विवाहबाह्य संबंधामुळे लग्नाची नातं एक क्षणात तुटली आहे. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जगाच्या पाठीवर असं एक शहर आहे, जिथे विवाहबाह्य संबंध हा गुन्हा मानला जात नाही. या शहरात त्याचे वेगळे कायदे आणि नियम आहेत.
कोणतं आहे ते शहर?
हे शहर आहे न्यूयॉर्क इथे 116 वर्षे जुन्या घटस्फोट कायद्यात मोठा बदल करण्यात आलाय. न्यूयॉर्कमध्ये व्यभिचाराला गुन्हेगार ठरवणारा कायदा अखेर रद्द करण्यात आलाय. 22 नोव्हेंबरला न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी हा कायदा रद्द करण्याच्या कायद्यावर स्वाक्षरी करून विवाहबाह्य संबंध गुन्हा मुक्त केलाय. 1907 मध्ये लागू करण्यात आलेल्या या कायद्यानुसार विवाहित व्यक्ती दुसऱ्या नात्यात असणे यासाठी दोषी आढळल्यास त्याला तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. पण हा कायदा क्वचितच वापरला गेला आणि बऱ्याच काळापासून अप्रासंगिक मानला गेला.
राज्यपालांनी का घेतला असा निर्णय ?
या निर्णयाबद्दल खुद्द राज्यपाल कॅथी हॉचुल यांनी माहिती दिलीय. ते म्हणाले की, 'मी स्वतः आनंदी विवाहित आहे आणि माझ्या पतीसोबत 40 वर्षांचा सुंदर प्रवास केला आहे. व्यभिचाराला गुन्हेगार ठरवण्यासाठी मी एका विधेयकावर स्वाक्षरी करत आहे. हे माझ्यासाठी थोडे उपरोधिक आहे. पण मला समजतं की लोकांची नाती गुंतागुंतीची असतात. ही प्रकरणे कोर्टात न जाता वैयक्तिकरित्या सोडवली पाहिजेत. हा जुना आणि अनावश्यक कायदा रद्द करण्याची वेळ आली आता आली आहे.
न्यूयॉर्कचा हा कायदा 1907 मध्ये पहिल्यांदा लागू करण्यात आला होता. ज्याच्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीने स्वत: किंवा इतर व्यक्ती आधीच विवाहित असताना एखाद्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल दोषी ठरवले जाऊ शकतं. न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालानुसार, हा कायदा लागू झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर, विवाहित पुरुष आणि 25 वर्षीय महिलेविरुद्ध पहिल्यांदाच याचा वापर करण्यात आला.
मात्र, गेल्या काही काळापासून या कायद्यांतर्गत दोषी आढळणाऱ्यांची संख्या खूपच कमी पाहिला मिळत होती. 1960 च्या दशकातही हा कायदा रद्द करण्याची चर्चा होती, मात्र काही नेत्यांचे असं मत होतं की तो रद्द केल्याने राज्य विवाहबाह्य संबंधांना प्रोत्साहन देत असल्याचे दिसून येईल. हा निर्णय कालबाह्य आणि अप्रासंगिक कायदे रद्द करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल तर आहेच, पण वैयक्तिक स्वातंत्र्यालाही प्राधान्य देणारा आहे.