बापाने लेकीला गिफ्ट केली खराब पाण्याने भरलेली बॉटल; कारण ऐकून तुम्हीही कराल कौतुक
Trending News In Marathi: वडिलांनी मुलीला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून खराब पाण्याची बॉटल दिली. मात्र, त्या मागील उद्देष वाचून तुम्हीही भारावून जाल
Trending News In Marathi: वाढदिवस हा प्रत्येकासाठीच खास असतो. या दिवशी आपल्या जवळची माणसं भेटवस्तू देतात. वाढदिवसाला मिळणारी गिफ्ट ही प्रत्येकासाठी स्पेशल असतात. मात्र एका तरुणीला तिच्या वडिलांनी दिलेले गिफ्ट पाहून ती देखील आश्चर्यचकित झाली. तिच्या वडिलांनी तिला वाढदिवसांचे गिफ्ट म्हणून खराब पाण्याने भरलेली बॉटल दिली आहे. महिलेने ट्विटरवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. तर, खराब पाण्याची बॉटल देण्यामागचे कारण ही तिने सांगितले आहे.
पेट्रीसिया माउ असं या महिलेचे नाव असून तिने एक्सवर (ट्विटरवर) तिचा हा अनुभव मांडला आहे. पेट्रीसिया म्हणते की, या वर्षी वाढदिवसानिमित्त माझ्या वडिलांनी मला बॉटेलमध्ये घाणेरडे पाणी भरुन मला ती गिफ्ट केली आहे. मी मस्करी करत नाहीये तर खरंच त्यांनी मला हे गिफ्ट केले आहे. पण हे पहिल्यांदाच घडत नाहीये की त्यांनी मला हे असं अनोखं गिफ्ट केले आहे. माझ्या वडिलांकडून मला असे चित्र-विचित्र गिफ्ट अनेकदा मिळाले आहेत.
या पूर्वी त्यांनी मला असे अनेक गिफ्ट केले आहेत. त्यात एक होतो प्राथोमिक उपचारांची पेटी, काळ्या मिर्चीचा स्प्रे, एक विश्ककोश, एक चावीचा गुच्छा, एक पुस्तक असे अनेक गिफ्ट्स त्यांनी मला याआधी दिले आहेत. मात्र, यंदा गिफ्ट देताना त्यांनी म्हटलं की यावर्षीच माझं गिफ्ट खूपच खास असणार आहे. कारण हे पैशांने खरेदी करता येणार नाही. ही आयुष्याचा एक मौल्यवान धडा आहे, असं पेट्रीसिया माउ यांनी म्हटलं आहे.
पेट्रीसिया माउ यांनी पुढे म्हटलं आहे की, घाणेरड्या पाण्याने भरलेली बॉटल गिफ्ट देण्यामागच उद्देष त्यांनी मला समजावून सांगितला. जेव्हा तुम्ही चिंताग्रस्त असता तेव्हा पाण्याची हलणारी बॉटेल तुमच्या जीवनाचे प्रतीक बनते. तेव्हा प्रत्येक गोष्टीत अस्वच्छता दिसते. पण जेव्हा मन स्थिर असते तेव्हा बॉटलमधील घाण 10 टक्क्यांपेक्षा कमी दिसते. त्यामुळं तुम्ही कोणत्या दृष्टीकोनातून बघता हे गरजेचे आहे. तुमचा दृष्टीकोन महत्त्वाचा आहे.
पुढे पोस्टमध्ये तिने म्हटलं आहे की, जन्मदिवसानंतर आलेल्या विंकेडला ती बॉटल समुद्र किनारी घेऊन आली आणि त्यातलं पाणी समुद्रात ओतून दिले. यानंतर तिने एक मोलाचा सल्ला देखील दिला आहे. तुम्ही महासागरातील एक थेंब नसून तुम्ही त्या थेंबातला महासागर आहात. खरं तर ही पोस्ट करण्यामागचा मुद्दा असा आहे की मी या व्यक्तीची मुलगी आहे. असं म्हणत तिने त्या बॉटला फोटोदेखील शेअर केला आहे.