Trending News :  आई होणं हे प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं. शारीरिक अडचणीमुळे अनेक महिला या आई होऊ शकतं नाही. अशावेळी डॉक्टर आयव्हीएफचा पर्याय देतात. विकी डोनर पिक्चर तुम्हाला आठवडतो का? त्यात आयुष्मान खुराना एक स्पर्म डोनर असतो. त्याने स्पर्म डोनेट केल्यामुळे अनेक महिलांचे आई होण्याचे स्वप्न पूर्ण होतं. या पिक्चरमध्ये दाखवण्यात आलं आहे की तो असंख्य मुलांचा जैविक बाप असतो. असाच एक रियल लाइफमधील स्पर्म डोनर तुम्हाला माहिती आहे का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅडम हूपर असं या स्पर्म डोनरचं नाव असून तो 18 मुलांचा जैविक बाप आहे. तो सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, कारण तो देशातील अनेक महिलांना मदत करण्यासाठी 
टूरवर निघाला आहे. ज्या महिलांना मूल हवं आहे, अशा महिलांना हूपर स्पर्म डोनेट करणार आहे. 


विशेष म्हणजे हूपरला स्वतःची दोन मुलं पण आहेत. यामुळे सध्या हूपर एकूण 20 मुलांचा बाप आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियामधील पर्थमधील हूपरला या टूरकडून खूप आशा आहे. या टूरदरम्यान आई होण्याची इच्छा असणाऱ्या अनेक महिला एकत्र येणार आहे. या टूरदरम्यान तो पहिले ब्रिस्बेनला गेला होता. तिथे त्याने 10 दिवसात अनेक महिलांना स्पर्म डोनेट केले. 


ऑस्ट्रेलिया ब्रिस्बेनमधील इंग्रिड स्टेफैन्यू या महिलेला हूपरने मदत केली होती. इंग्रिड स्टेफैन्यू ही महिला हूपरला भेटण्यापूर्वी मुलासाठी हवं ते करत होती. तिने आयव्हीएफ ट्रीटमेंटवर 10 लाखांपेक्षा जास्त पैसे खर्च केले. तरी तिच्या पदरी निराशा पडली. त्यानंतर इंग्रिडने 'स्पर्म डोनेशन ऑस्ट्रेलिया' या फेसबुक पेजद्वारे अॅडम हूपरशी संपर्क साधला. 
हूपरने केलेल्या मदतीनंतर इंग्रिड आई झाली. 


व्यवसायाने योगा शिक्षिका असलेल्या ग्रेटा फ्रेंच केनेडीलाही इतर स्पर्म डोनरकडून गर्भधारणा झाली नाही. मात्र तिनेदेखील हूपरशी संपर्क केला आणि तिला आई होण्याचं सुख मिळालं. न्यू साउथ वेल्समधील आयव्हीएफ कायदेशीररित्या 21 ते 45 वयोगटातील लोक स्पर्म डोनेट करु शकतात. 


एका पत्रकाराने अॅडमशी संवाद साधला. त्यावेळी हूपरने आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली.  ''माझ्या स्पर्मपासून जन्माला आलेल्या मुलांच्या आयुष्यातील मला एक भाग व्हायची इच्छा आहे. तसंच त्या सगळ्यांसोबत मला एक फोटो क्लिक करायचा आहे. ज्या मुलांना त्यांच्या जन्मदात्याबद्दल जाणून घ्यायचे आहे, ते मला भेटू शकतात'', असं हूपर म्हणाला.