150 वर्ष जगणार मनुष्य, वैज्ञानिक शोध घेणार? 2024साठी नास्त्रेदमसची भविष्यवाणी
Nostradamus Predictions For 2024: नास्त्रेदमसने नवीन वर्षासाठी म्हणजेच 2024साठी भाकित वर्तवले आहे. तसंच, हवामानातील बदल, दुष्काळ आणि भूकंप या बाबतही भविष्यवाणी केली आहे.
Nostradamus Predictions 2024: 2023 सरणार असून नवीन वर्षांची चाहुल लागली आहे. जगासाठी 2024 हे नवीन वर्ष कसे असणार आहे याबाबत फ्रान्सचे ज्योतिषी नास्त्रेदमस यांनी आधीच भविष्यवाणी केली आहे. 16 व्या शतकातील नास्त्रेदमस हे आजही त्यांनी केलेल्या भविष्यवाणीसाठी ओळखले जातात. 1555 मध्ये, लेस प्रोफेटीजमध्ये प्रकाशित झालेल्या भविष्यातील घटनांबद्दलच्या त्यांच्या भविष्यवाण्यांमध्ये जगभरात घडणाऱ्या घटनांचा समावेश होता. तथापि, या लेखांमधील अस्पष्ट तपशीलांमुळे, अनेक भविष्यवाण्यांचे स्पष्टीकरण करणे कठीण आहे.
2024साठी नास्त्रेदमसची भविष्यवाणी
नास्त्रेदमस यांनी चर्चमधील पोपसंदर्भात भविष्यवाणी केली होती. 2024मध्ये जगाला नवीन पोप मिळू शकतो. सध्याचे पोप हे वृद्धत्वाकडे झुकत असल्याने नास्त्रेदमसची भविष्यवाणी खरी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याशिवाय त्यांनी हवामान आपत्तींबाबतही इशारा दिला आहे. 2024साठी त्यांनी हा इशारा दिला होता. यंदा अनेक ठिकाणी दुष्काळ तर काही ठिकाणी पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. याशिवाय जगभरात खराब हवामानाची शक्यता आहे. तसंच, मोठ्या प्रमाणात उपासमारीची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
नास्त्रेदमसने जपानच्या किनारी भागातील शहरांबाबतही इशारा दिला आहे. 2024 मध्ये किनारपट्टीवरील शहरांमध्ये भूकंपाचा व त्सुनामीचा धोका निर्माण होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. याशिवाय त्यांनी धोकादायक विषाणू पसरण्याची शक्यताही वर्तवली आहे. कोविड-19 नंतर, जगाला कोणत्याही संसर्गाबाबत भीती वाटू लागली आहे. अशा स्थितीत नवीन वर्षात आणखी एका धोकादायक विषाणूचे भाकित वर्तवल्याने चिंता वाटू लागली आहे.
नास्त्रेदमसने केलेल्या भाकितानुसार, 2024मध्ये विज्ञान अधिक प्रगती करेल. 2024मध्ये वैज्ञानिक असा शोध लावतील ज्यामुळं मानवाचं आयुष्य 150 ते 170 वर्षांनी वाढेल. सध्या जगभरातील मानवाचे आयुर्मान हे ७० ते ८५ वर्ष आहे. नास्त्रेदमसची ही भविष्यवाणी खरी ठरली तर मानवाचे वय दुप्पटीने वाढेल व तो जास्तकाळ जगू शकेल.
केव्हा-केव्हा खरे ठरले नास्त्रेदमसचे भाकित
नास्त्रेदमसच्या लेस प्रोफेसीज या पुस्तकात फ्रेंच राज्यक्रांती, जपानवर अणुबॉम्ब टाकणे, अॅडॉल्फ हिटलरचा उदय यासह अनेक भाकिते करण्यात आली होती, जी खरी ठरली आहेत. २०२३ सालाबद्दल त्यांनी जे भाकित केले होते, त्यानुसार या वर्षी तिसऱ्या महायुद्धाचे दृश्य पाहायला मिळणार आहे. यावर्षात रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद असतानाच हमास आणि इस्त्राइल यांच्यात युद्ध भडकले होते.