Job layoffs: कोरोनानं नोकरी, नोकरदार या संकल्पना 360 अंशांनी बदलल्या. अनेकांच्या कामाचं स्वरुप बदललं तर, अनेकांच्या पगाराचं. काही कंपन्यांनी मानवी योगदानाला कमी महत्त्वं देत यंत्र आणि Automatic पद्धतीनं होणाऱ्या कामाला प्राधान्य दिलं आणि इथंच सुरु झालं कर्मचाऱ्यांना कंपनीबाहेरचा रस्ता दाखवण्याचं सत्र. 2022 च्या अखेरीस संपूर्ण जगभरातून अनेक मोठ्या कंपन्यांनी तुकड्या तुकड्यांमध्ये कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2023 मध्येही ही लाट कायम राहिली आणि आता 2024 मध्येसुद्धा जागतिक आर्थिक मंदीच्या झळा नोकरदार वर्गाला बसत असून, अनेकांना या वर्षातही नोकरीला मुकावं लागण्याची परिस्थिती उदभवू शकते. किंबहुना कर्मचारी कपातीला सुरुवातही झाली आहे. अनेक आयटी कंपन्यांनी एकाएकी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या फरकानं कमी करण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये आता Google सुद्धा सहभागी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


9to5Google ला दिलेल्या एका सूचनापर पत्रकामध्ये याविषयीच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. hardware division मधील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणार असल्याचे संकेत गुगलनं दिले आहेत. यामध्ये डिजिटल असिस्टंट आणि इंजिनिअरिंग टीम्सचा समावेश आहे. व्हॉईस बेस्ड गुगल असिस्टंड आणि रिअॅलिटी हार्डवेअर टीमवर ही नोकरकपात परिणाम करणार आहे. त्याशिवाय कंपनीच्या मध्यवर्ती इंजिनिअरिंग टीममध्ये काम करणाऱ्या इंजिनिअर्सवरही याचा परिणाम होणार आहे. 


कंपनीनं सूचना पत्रकात काय म्हटलंय? 


'DSPA मधील शेकडो पदं आणि  1P AR Hardware team मधील शेकडो पदांवर येत्या काळात फरक पडणार आहे. सध्या कंपनीकडून  1P AR Hardware team मध्ये काही बदल केले जात असून, गुगल येत्या काळात AR initiatives वर जास्त भर देणार आहे. ज्यामध्ये प्रोडक्ट आणि प्रोडक्ट पार्टनरशिपचा समावेश असेल', असं कंपनीच्या पत्रकामध्ये म्हटलं गेलं आहे. 


गुगलवर का ओढावली ही वेळ? 


मायक्रोसॉफ्ट आणि OpenAI यांच्याकडून सध्या गुगलला आर्टिफिशिअर इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये टक्कर दिली जात आहे. सध्या या दोन्ही कंपन्या ChatGPT आणि Co-Pilot या सेवांना आणि इतर एआय सुविधांना सर्व स्तरावर प्रसिद्धीझोतात आणत असून, गुगलच्या main search business वर याचा थेट आणि विपरित परिणाम होताना दिसत आहे. परिणामी संस्थेतील वरिष्ठ पदावर असणारी मंडळी सध्या उत्पादन शुल्क कमी करून हे अर्थसहाय्य कंपनीच्या ध्येय्यप्राप्तीकडे वळवण्याच्या दृष्टीनं कामं करू लागली आहेत. 


हेसुद्धा वाचा : अभिनेत्रीचं आडनाव शेख; वडिलांचं नाव मात्र विपीन शर्मा, असं कसं? 


लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे Fitbit चे सहसंस्थापक जेम्स पार्क, एरिक फेडमन आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती कंपनीतून बाहेर पडल्यानंतर या नोकरकपातीनं डोकं वर काढलं आहे. ज्यानंतर गुगलनं पिक्सल, नेस्ट आणि फिटबिट हार्डवेअरवर काम करणाऱ्या टीमची नव्यानं बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. तेव्हा या नोकरकपातीच्या लाटेमध्ये आता नेमके किती कर्मचारी बळी पडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.