Amazon Pay To Quit : ठराविक वर्ष नोकरी केल्यानंतर निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना कंपनीकडून निवृत्ती रक्कम दिली जाते. जगातील प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी  अ‍ॅमेझॉनने (Amazon) आपल्या कर्मचाऱ्यांना भन्नाट ऑफर दिली आहे. ऑन द स्पॉट नोकरी सोडा 4 लाख मिळवा अशी ही ऑफर आहे.  अ‍ॅमेझॉन कंपनीने कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यासाठी दिलेल्या ऑफरमागचे कारण खूपच इंटरेस्टिंग आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले जेफ बेजोस (Jeff Bezos) हे Amazon कंपनीचे मालक आहेत.  पे टू क्विट (Pay To Quit) नावाचा प्रोग्राम Amazon कंपनी राबवण्याक येतो. या अंतर्गत नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना 4 लाख रुपये दिले जातात. या योजनेसाठी कंपनीने एक बजेट देखील मंजूर केला आहे. जेफ बेजोस हे विशिष्ट धोरणांसाठी ओळखले जातात. यामुळे त्यांचा Pay To Quit प्रोगाम देखील चांगलाच चर्चेत आला आहे. 


का दिली कर्मचाऱ्यांना Pay To Quit ची ऑफर


Amazon मध्ये नोकरी हा अनेक तरुणांसाठी ड्रीम जॉब असतो. अनेकजण Amazon मध्ये नोकरी करण्याचा अनुभव घेतात. Amazon चे मालक जेफ बेजोस हे वेगळा विचार करतात.  कंपनीला नव नविन आयडिया मिळाव्यात यासाठी नविन स्टाफची गरज आहे. यामुळे जास्तीत जास्त नविन कर्मचाऱ्यांना संधी देण्यासाठी Amazon कंपनीने Pay To Quit प्रोगाम ही संकल्पना मांडली आहे. 


नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा


Pay To Quit प्रोगाम अंतर्गत नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना Amazon  अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. नविन नोकरी मिळेपर्यंत कंपनी कर्मचाऱ्यांना आर्थिक सहाय्य करणार आहे. Pay To Quit प्रोगाम अंतर्गत Amazon कंपनी नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या करिअरची पूर्ण काळजी घेणार आहे. यामुळे नविन नोकरी मिळवताना कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही असा दावा कंपनीने केला आहे. 


अमेझॉन कंपनीचा  18000 कर्मचा-यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय 


अ‍ॅमेझॉन कपंनी भारतातील सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. अमेझॉन ही अमेरिकन कंपनी असून जगभरात 18000 कर्मचा-यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय कंपनीने घेतला होता. त्यापैकी 1000 जण भारतातले होती. अनिश्चित आर्थिक परिस्थितीमुळे कंपनीने नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही नोकर कपात टळली होती.