Afghanistan Earthquake Emotional Video : शनिवारी झालेल्या भूकंपानंतर सध्या अफगाणिस्तानातील (Afghanistan Earthquake) परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं पहायला मिळतंय. अफगाणिस्तानच्या विनाशकारी भूकंपामध्ये आतापर्यंत 2445 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती तालीबानी सरकारच्या (Taliban Government) वतीने देण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वी अफगाणिस्तानात सर्वात शक्तिशाली भूकंप 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. त्यामुळे हेरात (Herat) प्रातांतील अनेक गावं उद्धवस्त झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर विविध प्रातांत देखील भूकंपाचे हादरे बसले अन् हजारो लोकं मृत्यूच्या दारात आहेत. अशातच आता धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात (Herat Earthquake) शनिवारी सलग चार भूकंपाचे धक्के बसले अन् आसपासच्या भागात मोठं नुकसान झाल्याची माहिती रॉयटर्सने दिली आहे. तालिबान सरकारमधील आर्थिक व्यवहार मंत्री अब्दुल गनी बरादर यांनी जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल दु:ख व्यक्त केलंय. त्याचबरोबर मदतकार्य लवकरात लवकर पोहोचाण्याच्या सुचना देखील देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र, अजूनही परिस्थितीत खराब असल्याचं दिसून आलंय. अशातच आता अफगाणिस्तानमधून एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे.


सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये (Afghanistan Earthquake Emotional Video) दिसतंय की, एक व्यक्ती भूकंपामुळे खचलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यात आपल्या कुटुंबाला शोधत आहे. त्यावेळी त्याला अश्रू अनावर झाले. भूकंपामुळे सर्वत्र केवळ धूळ आणि माती उडताना दिसत असून घराचे विखुरलेले ढिगारे दिसत आहेत. असं दृश्य पाहून त्या व्यक्तीचा स्वतःवरचा ताबा सुटतो अन् तो ओक्साबोक्शी रडायला लागतो. माझं अख्खं कुटुंब संपलं आता मी काय करू असं म्हणत तो देवाला दोषी ठरवताना दिसतोय. त्याचं रडणं पाहून अनेकांच्या डोळ्यात देखील पाणी आलंय.


पाहा Video



दरम्यान, आत्तापर्यंत या भूकंपात 10,000 हून अधिक लोकं जखमी झाले आहेत. तर शोध न लागलेल्यांची संख्या न मोजता येणारी आहे. त्यामुळे आता जगभरातील लोक अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर दु:ख व्यक्त करताना दिसत आहेत.