Curd Kitchen Tips : भारतात पुरातन काळापासून दह्याचे सेवन अन्नपचनासाठी केले जाते. दही हे आपल्या आरोग्यासाठी किती चांगलं आहे हे सांगायचं काही गरज नाही. पण तुम्हाला माहितीये का दही पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पण ते जेव्हा फ्रेश असतं तेव्हाच खाणं महत्त्वाचं असतं. जास्त वेळ ठेवलेले दही विशेष करून उन्हाळ्यात लवकर आंबट होऊन खराब होतं. अशा परिस्थितीत त्यानं आपल्या आरोग्याला धोका होऊ शकतो. त्यामुळेच घरातील दही आंबट झाली की ती फेकून दिली जाते. पण तुम्हाला माहितीये का? या खराब झालेल्या दह्याचे अनेक फायदे देखील आहेत. विशेष करून साफसफाईसाठी आंबट दहीचा वापर केला जाऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मसाल्याचे डब्बे धुवा 
किचनमधील धूळ आणि वाफेमुळे मसाल्यांचे डबे लवकर खराव होतात. मात्र, या तेलकट आणि काळपट झालेले डबे हे किचनची शोभा घालवतात. त्यामुळए दोन-तीन आठवड्यात ते डब्बे आपली आई साफ करताना दिसते. त्यांना साफ करायचे असेल तर त्यांना थोडावेळ कोमट पाण्यात ठेवा त्या नंतर बेकिंग सोडा घेऊन दह्यामध्ये मिसळून पेस्ट तयार करा आणि स्पंजने बॉक्सवर लावून घासून स्वच्छ करा.


किचनमधील तेल-मसाल्याचे डाग काढले जाऊ शकतात 
अनेकदा स्वयंपाक करताना तेल आणि मसाले सांडतात त्याचे डाग फरशीवर पडले की लवकर जाण्याचं नाव घेत नाहीत. बऱ्याच वेळा तर असे होते की फर्शी ही पांढरी असते पण मग मसाले आणि तेल सांडल्यानं फर्शी पिवळी दिसू लागते. त्यामुळे  डाग असलेल्या भागावर दही लावून ते थोडावेळ तसेच राहू द्या. त्यानंतर दह्याच्या पाण्यात थोडासा बेकिंग सोडा मिसळा व ब्रशच्या मदतीने डाग घासून घ्या आणि मग पुसून टाका. त्यांनतर पाण्याने धुवून तो भाग ओल्या कापडाने पुसून घ्या.


पितळाची-तांब्याची भांडी स्वच्छ करा
अनेकांचा घरात आजही स्टील आणि काचेच्या भांड्यांसोबत पितळ आणि तांब्याची भांडी वापरली जातात. जर तुमच्या किचनमध्येदेखील पितळाची आणि तांब्याची भांडी असतील तर ती स्वच्छ ठेवण्यासाठी व पुन्हा चकचकीत करण्यासाठी दही वापरू शकता. या भांड्यांवर काळे पडलेले डाग सामान्य डिशवॉशरनं निघत नाहीत पण दही यावर प्रभावी पद्धतींत काम करत. यासाठी दही हातात घेऊन तांब्या पितळ्याचा भांड्यावर घासावे. नंतर डिशवॉशर आणि मग पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.


हेही वाचा : Deepika Padukone नं सोशल मीडियावरील नावात केला मोठा!


टाइल्स-कॅबिनेट होतील चकचकीत
स्वयंपाकघरातील गॅसवर जेवण बनवत असताना त्याच्या निघणाऱ्या वाफेतून बाहेर येणाऱ्या तेल आणि मसाल्यांमुळे भिंतीवर आणि त्याच्या आजूबाजूच्या फरशा आणि कॅबिनेट खूप चिकट होतात. शिवाय ते नुसत्या पाण्याने तर मुळीच स्वच्छ करणे खूप कठीण होते. अशावेळी आपण ते स्वच्छ करण्यासाठी दह्याचा वापर करू शकतो. यासाठी एका भांड्यात गरजेनुसार दही घ्या आणि त्यात कपडे धुण्याची डिटर्जंट पावडर घाला. आता ही पेस्ट तेलकट झालेल्या भागाला लावा आणि स्पंजने पुसून स्वच्छ करून घ्या. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)