Deepika Padukone नं सोशल मीडियावरील नावात केला मोठा!

Deepika Padukone नं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंचट्या नावात मोठा बदल केला आहे. तिनं केलेल्या या बदलानं सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे. इतकंच काय तर तिच्या चाहत्यांना तिचं असं करण्याचं कारण देखील जाणून घ्यायची आहे. नुकतंच दीपिकानं टाइम्स मॅगझिनच्या कव्हर फोटोसाठी शूट केलं होतं. 

दिक्षा पाटील | Updated: May 26, 2023, 06:13 PM IST
Deepika Padukone नं सोशल मीडियावरील नावात केला मोठा! title=
(Photo Credit : Social Media)

Deepika Padukone : बॉलिवूडची मस्तानी अभिनेत्री दीपिका पदुकोण आज एक ग्लोबल स्टार आहे. दीपिकाचे लाखो चाहते आहेत. तिच्या सगळ्या अपडेट्स घेण्यासाठी अनेकांनी तर नोटिफिकेशन ऑन या ऑपश्नला देखील ऑन ठेवले आहे. दीपिका ही सगळ्यांची लाडकी आहे. दीपिका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत दीपिका चाहत्यांच्या संपर्कात राहते. असे अनेक तिचे चाहते आहेत जे दीपिका जसं करते तसं करतात. अनेक चाहते आहेत जे तिला कॉपी करतात असं म्हणायला हरकत नाही. दीपिका सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. दीपिकानं तिच्या सोशल मीडियाच्या बायोमध्ये खूप मोठा बदल केला आहे. त्यानंतर सगळ्यांची लक्ष हे तिनं वेधले आहे. 

दीपिकानं हा बदल तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या बायोमध्ये केला आहे. दीपिकानं तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये तिचं इंग्रजीतलं नाव काढत आता तिथे (दीपिका पादुकोण) असे हिंदीत लिहिले आहे. दीपिकाच्या बायोमध्ये हा बदल झालेला पाहता. तिनं असा निर्णय का घेतला हे अनेकांना कळलं नाही आहे. 

Deepika Padukone change her instagram bio name to hindi know in details

खरंतर दीपिका ही सध्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर दिसली होती. दीपिका ही सहावी भारतीय आहे जी टाइम मॅग्झिनच्या कव्हर पेजवर झळकली आहे. दीपिकाआधी परवीन बाबी, ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, आमिर खान आणि शाहरुख खान या कलाकारांना टाइमच्या कव्हर पेजवर जागा मिळाली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, दीपिकानं टाइम्स मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत कव्हर पेजवर येण्यावर ती म्हणाली होती की "भारताशी जोडलेले असताना, माझ्या देशाचा संपूर्ण जगभरात प्रभाव पाडणे हे माझे ध्येय आहे. हा भारताचा क्षण आहे. एकीकडे आपला वारसा, आपला इतिहास आणि परंपरेनं भरलेला देश तर दुसरीकडे भारताची नवी पिढीसुद्धा स्वत:ला सिद्ध करताना मला दिसत आहे. याचा अर्थ म्हणजे दोन भारत एकत्र येणे याचं मला आता आकर्षक वाटत आहे."

हेही वाचा : सिद्धीविनायक मंदिरात गेल्यानंतर Akash Ambani ट्रोलर्सच्या निशाण्यावर, काय आहे कारण?

दरम्यान, दीपिका पदुकोण लवकरच फाइटर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका हृतिक रोशनसोबत दिसणार आहे. याशिवाय दीपिकाकडे ‘Project K’ हा चित्रपट देखील आहे. तर सगळ्यात शेवटी दीपिका ही किंग खान म्हणजेच शाहरुख खानसोबत पठाण या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. तर हा चित्रपट सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.