मुंबई : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर गोळीबार झाला आहे. या हल्ल्यात इम्रान यांच्या उजव्या पायाला गोळी लागली. तर काही जण जखमी झालेत. इम्रान खान यांच्यावर रॅलीदरम्यान गोळीबार झाला. त्यांना जीवे मारण्यासाठीच गोळीबार केल्याचं हल्लेखोराने कबूल केलंय. इम्रान खान यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला एका व्यक्तीने पकडलं. त्याच्यावर तुटून पडला आणि बंदूक हिसकावून घेतली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इम्रान खान यांनी सरकारच्या विरोधात रॅली काढली आहे. यादरम्यानच त्यांच्यावर हा गोळीबार झाला. हल्लेखोर पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पण नंतर लोकांनी त्यांना पक़डले. दोघांपैकी एक हल्लेखोर ठार झाला असून एकाला ताब्यात घेण्यात आलंय.



इम्रान खान यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पाकिस्तानात राजकीय अस्थिरता निर्माण झाली असतानाच इम्रान खान यांच्यावर हा हल्ला झाला. यावर जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. भारताने देखील या हल्ल्याचा निषेध केलाय.



दुसरीकडे सरकारविरोधातील आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं इम्रान खान यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.