नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाःकार माजवला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रूग्णांची संख्या कमी झालेली दिसून आली. परंतु आता कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोना रूग्णांची संख्या वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे UK स्ट्रेननंतर भारतात द. अफ्रिका आणि ब्राझीलमधील नवा कोरोना स्ट्रेन भारतात दाखल झाला आहे. त्यामुळे भारतात पुन्हा कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण अफ्रिकेतून भारतात आलेल्या 4 लोकांना नव्या कोरोना स्ट्रेनची लागण झाल्याचं समोर आलं आहे. शिवाय ब्राझीलमधून आलेल्या एका व्यक्तीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतील वेरिएंट हा नवा स्ट्रेन अमेरिकेसोबतच आणखी 41 देशांमध्ये पसरला आहे.  


आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की जानेवारीत, भारतात 4 जणांना दक्षिण आफ्रिकेच्या एसएआरएस-सीओव्ही -२ विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे, तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ब्राझीलच्या एका व्यक्तीला संसर्ग झाल्याचे नोंदवले गेले. त्यामुळे आता अधिक दक्षाता बाळगण्याची गरज आहे. 


आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव म्हणाले की, भारतात परत आलेल्या चार जणांना दक्षिण आफ्रिकेच्या विषाणूची लागण होण्याची पुष्टी झाली आहे. संक्रमितांपैकी 2 जण दक्षिण आफ्रिकेतून परत आले, तर 1-1 अंगोला आणि टांझानियाहून परत आले. 



आता बाहेरून आलेल्या सर्वांना तपासणीसाठी क्वारंटाइन करण्यात आलं आहे. संपूर्ण परिस्थिती पाहता कोरोनाचा धोका वाढत असल्याचं दिसून येत आहे. त्याचप्रमाणे मुंबईत जानेवारी महिन्यात रुग्ण संख्या वाढू लागली आहे. दिवसाला सरासरी ३०० ते ३५० रुग्ण वाढ होत होती. पण आता हा आकडा ६५० पर्यंत पोहोचला आहे. 


मुंबईत लोकल सर्वांसाठी सुरु केल्यानंतर १५ दिवसांनी निरीक्षणांचा कालावधी आहे. जो २१ फेब्रुवारीला संपत असल्याने २२ फेब्रवारीला महापालिका आढावा घेणार आहे. २ फेब्रुवारीपर्यंत रुग्ण संख्या अशीच वाढत राहिली तर लोकलबाबतचा निर्णय हा बदलला जावू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.