नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या अजूनही वाढतच आहे. आता दररोज ८० हजाराहून अधिक रुग्ण वाढत आहेत. तर मृत्यू होणाऱ्यांची संख्या एक हजाराहून अधिक आहे. कोरोनाच्या वेगाने वाढत्या रुग्णांमुळे भारत संक्रमित रुग्णांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे. ब्राझीलला मागे टाकत भारत आता अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कोरोना संक्रमितांची संख्या 40,96,690 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 70,500 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. ब्राझीलमध्ये कोरोना संक्रमितांची संख्या 40,91,801 आहे तर 1,25,500 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात सामर्थ्यवान देश असलेला अमेरिका अजूनही याबाबतीत पहिल्या स्थानावर आहे. अमेरिकेत कोरोना संक्रमितांची संख्या 62 लाखाहून अधिक आहे तर आतापर्यंत 1 लाख 88 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.


31 लाखाहून अधिक रुग्ण बरे


शनिवारी देशात 83 हजाराहून अधिक नवीन रुग्णांची वाढ झाली असून 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी भारतात कोरोनाचे 83,232 विक्रमी रुग्णांची नोंद झाली होती. तर 1089 रुग्णांचा मृत्यू झाला होता.


भारतात कोरोनाचे 8,60,134 सक्रिय रुग्ण आहेत. पण रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत 31,72,000 पेक्षा अधिक रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. शनिवारी 67 हजाराहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.