Indonesia earthquake : इंडोनेशियात भूकंपाचे जोरदार धक्के; 6.9 रिश्टर इतकी तीव्रता
Indonesia earthquake : नेपाळमागोमाग इंडोनेशियात भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळं आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Indonesia earthquake : नेपाळमध्ये आलेल्या भूकंपानंतर परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोच आता इंडोनेशियाही भूकंपानं हादरला आहे. इंडोनेशयातील सोमलाकी शहरामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असून रिश्टर स्केलमध्ये त्यांची तीव्रता 6.9 इतकी असल्याचं म्हटलं जात आहे. संयुक्त राज्य भूवैज्ञानिक सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार हा भूकंप 7.1 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता. बुधवारी इंडोनेशियातील Banda Sea येथे हा भूकंप आला. येथील अंबोन भागापासून साधारण 370 किमी दक्षिणपूर्वेचा या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूपृष्ठापासून 146 किमी इतक्या खोलीवर ही कंपनं जाणवली. दरम्यान या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात येणार का, असे प्रश्न अनेकांना पडले. पण, तूर्तास तसा कोणताही इशारा किमान Pacific Tsunami Center कडून देण्यात आलेला नाही.
समुद्रात आलेल्या या भूकंपामुळं अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. त्यामुळं आता इंडोनेशियातील इतर भौगोलिक घटनांवर तज्ज्ञ लक्ष ठेवून आहेत. इंडोनेशियात भूकंप येण्याची ही पहिलीच वेळ नाही.
हेसुद्धा वाचा : 'टायटॅनिक 2.0' होता होता वाचलं... खवळलेला समुद्र, मोठ्या लाटा आणि...; Video पाहून अंगावर येईल काटा
मुळात हा भाग पॅसिफिक महासारगातील रिंग ऑफ फायरवर आहे, त्यामुळंच इथं सातत्यानं भूकंप येत राहतात. रिंग ऑफ फायर हा पॅसिफिक महासागर, कोकोस, भारत- ऑस्ट्रेलिया, जुआन डे फूका, नाजका, उत्तर अमेरिका आणि फिलीपीन टेक्टोनिक प्लेट्सशी अंतर्गत जोडली गेली आहे.
अशा या रिंग ऑफ फायरवर इंडोनेशिया, पापुआ न्यू गिनी, चिली,इक्वाडोर, पेरू, रूस, जापान, फिलीपींस, ऑस्ट्रेलिया, बोलीविया, कोस्टा रिका, न्यूजीलैंड, ग्वाटेमाला, मेक्सिको, अमेरिका, कॅनडा आणि अंटार्क्टिका आहे असं सांगितलं जातं.