वॉशिंग्टन: संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले असताना या व्हायरसच्या उत्पत्तीचे मूळ ठिकाण असलेला चीन मात्र या संकटाचा फायदा उचलताना दिसत आहे. या काळात इतरांना मदत करणे तर सोडाच पण चीन खाल्ल्या मिठालाही जागताना दिसत नाही. चीनच्या याच कृतघ्नपणाचे एक उदाहरण समोर आले आहे. वुहानमध्ये कोरोना थैमान घालत असताना इटलीने चीनमधील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी PPE किटस् फुकटात देऊ केली होती. मात्र, आता कोरोनामुळे इटली संकटात सापडला आहे. अशावेळी चीन इटलीनेच दिलेली किटस् त्यांना पैसे घेऊन विकत आहे. चीनच्या या कृतघ्नपणाविषयी अनेकजण संताप व्यक्त करत आहेत.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पेक्टॅटर नियतकालिकाच्या माहितीनुसार, चीनने काही दिवसांपूर्वी इटलीला  PPE किटस् दिल्याचे जाहीर केले होते. मात्र, चीनने इटलीला ही किटस् मोफत नव्हे तर पैसे देऊन विकली आहेत. ट्रम्प प्रशासनातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात स्पेक्टॅटर नियतकालिकाला माहिती दिली. चीनने इटलीला त्यांचीच PPE किटस् विकत घ्यायला भाग पाडल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला आहे. 


पाकिस्तानकडून एअर इंडियाच्या पाठीवर शाबासकीची थाप

युरोपात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी चीनमधील वुहान हे कोरोनाच्या थैमानाचे मुख्य केंद्र होते. त्यावेळी इटलीने चीनच्या मदतीसाठी ही किटस् देऊ केली होती. मात्र, आता संकटाच्या काळात इटलीने चीनकडे मदतीची मागणी केल्यानंतर चीनने यापैकी थोडीच किट त्यांना देऊ केली आहेत. तसेच यासाठी चीनने पैसेही आकारले आहेत. 

काही दिवसांपूर्वीच चीनने स्पेनला कोरोनाच्या चाचणीसाठी लागणारी किटस् विकली होती. मात्र, या किटसमध्ये त्रुटी असल्यामुळे स्पेनमध्ये कोरोना व्हायरस वेगाने पसरला होता. यानंतर स्पेनने ५० हजार दोषपूर्ण किटस् पुन्हा चीनला पाठवून दिली होती. नेदरलँडसला पाठवण्यात आलेली चिनी मास्कही असेच बनावट असल्याचे आढळून आले होते. याविषयी जाब विचारला असता चीनने उलट नेदरलँडसलाच सुनावले होते. 


आनंदाची बातमी! अखेर स्पेनमध्ये कोरोनाच्या साथीला उतार

वुहानमधील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणल्यानंतर चीनमधील दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. त्यामुळे आता चीनमधील बाजारपेठा आणि कारखानेही सुरु झाले आहेत. या कारखान्यांमध्ये वेगाने उत्पादन सुरु झाले आहे. मात्र, चीनने जगाला वेळीच सावध न केल्यामुळे कोरोना सध्या संपूर्ण जगात थैमान घालत आहे.