मुंबई : जपानच्या राजकुमारीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकुमारीने एका भीतीमुळे हा निर्णय घेतला आहे. गेल्या ७ वर्षांपासून आपल्या प्रियकराशी लग्न करण्याची वाट पाहत आहे. राजकुमारी माको को तिथल्या नियमानुसार लग्न करणं टाळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जपानच्या नियमांनुसार आणि शाही कुटुंबियांच्या परंपरेनुसार राजकुमारी माको कोणत्या बाहेरच्या व्यक्तीशी लग्न करते तर तीला राजकुमारीचं स्टेटस गमवावं लागेल. त्यांना सामान्य लोकांप्रमाणे आयुष्य घालवावं लागेल. याच भीतीमुळे राजकुमारी आता आपल्या प्रियकरासोबतचा विवाह पुढे ढकलत आहे. 


राजकुमारी माकोने असं ऐलान केलं आहे की, आपलं लग्न पुढे ढकलत आहे. २८ वर्षांच्या राजकुमारीने या अगोदर म्हणजे २०१७ मध्ये देखील लग्न टाळलं होतं. या अगोदर राजकुमार माको लग्न टाळून शिक्षणासाठी ब्रिटेनमध्ये गेली. त्यांच्या प्रेमाबद्दल बोलायचं झालं की, त्यांच्या प्रियकराचं नाव कई कोमुरो असं आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी काम करतात. कोमुरे स्कीईंग देखील करतात. त्याचप्रमाणे वायलिन वाजवणं, स्वयंपाक करणं आवडतं. 



कोमुरोसोबतचं लग्न टाळल्यानंतर राजकुमारी म्हणते की,'यावेळी भविष्याची योजना करणं महत्वाचं वाटतं'. तसेच आता काहीही म्हणणं नाही. मात्र आम्ही एकमेकांपासून दूर राहू शकत नाही. आम्ही आता लग्नाशिवाय एकमेकांसोबत राहत आहोत.