काय आहे या संस्कृत शब्दांचा अर्थ, ज्याचा परदेशी सेलिब्रिटी गोंधवून घेतायत टॅटू...
तुम्ही जर पाहिले असाल तर, आता विदेशातील लोकांचा कल आता भारतीय संस्कृतीकडे वळला आहे. त्यांना भारतीय गाणी किंवा संगीत ऐकायला आवडते. तर काहींना भारतीय सणांचे आकर्षण आहे.
मुंबई : तुम्ही जर पाहिले असाल तर, आता विदेशातील लोकांचा कल आता भारतीय संस्कृतीकडे वळला आहे. त्यांना भारतीय गाणी किंवा संगीत ऐकायला आवडते. तर काहींना भारतीय सणांचे आकर्षण आहे. तर काही विदेशी लोकांना भारतीय नृत्याचेही वेड लागलेले तुम्ही पाहिले असणार. पंरतु आता विदेशातील लोकांचा कल हिंदी आणि संस्कृत भाषेकडेही वाढू लागला आहे. कारण विदेशातील बहूतेक सेलेब्रिटीं संस्कृत शब्दांचे टॅटू बनवू लागले आहेत. तसेच येथील लोकं देवनागरी भाषेतही टॅटू बनवत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
सध्या विदेशात ट्रेंड करत असलेल्या टॅटूपैकी एक आहे, 'अनुगच्छतु प्रवाह' या शब्दाचा टॅटू विदेशातील अनेक लोकं बनवत आहेत. अमेरीकेतील फेमस सिंगर आणि साँग रायटर केटी पेरी ने ही 'अनुगच्छतु प्रवाह' चा टॅटू आपल्या हातावर काढला आहे. या टॅटू विषयी सोशल मीडियावर चर्चा देखील सुरु आहे. परंतु याचा अर्थ काय आहे? आणि ते हे का काढतात?
'अनुगच्छतु प्रवाह' याचा अर्थ काय?
विदेशात आणि भारतात बहुचर्चीत असलेला 'अनुगच्छतु प्रवाह' या शब्दाचा अर्थ आहे, प्रवाहासोबत जाणे (Go with flow) याचा अर्थ असा की, तुमच्या आयुष्यातील समोर आलेल्या गोष्टींना तोडं देत चला किंवा जे समोर येईल, आयुष्य जी दिशा दाखवेल तसे चालत राहा. प्रत्येकाने या शब्दाला आपल्या म्हणण्याप्रमाने घेतले आहे. परंतु स्वच्छंदी जगायला कोणाला आवडत नाही? त्यामुळेच या शब्दाला लोकांनी आपल्या आयुष्याचा एक भाग बनवायला सुरवात केली आहे.
विदेशा पाठोपाठ आता भारतीय लोकं ही 'अनुगच्छतु प्रवाह' टॅटू काढत आहेत. एवढेच काय तर 'अनुगच्छतु प्रवाह' लिहिलेले टी-शर्टला देखील मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. विदाशातील मोठे ब्रँड्स देखील 'अनुगच्छतु प्रवाह' चे टी-शर्ट विकत आहेत.
अमेरीकेच्या फेमस सिंगर केटी पेरीच्या डाव्या हातावर हा टॅटू आहे. त्यानंतर अमेरीकेचे फेमस कॉमेडियन, एक्टर रसॅल ब्रँड ने ही 'अनुगच्छतु प्रवाह' हा टॅटू काढला आहे.
रसॅल ब्रँड हा 'हरे कृष्णा' गटाशी संबंधीत आहे. ज्यामुळे त्याला भारतातही ओळखले जाते. 2010 मध्ये त्याने पॉप स्टार केटी पेरीसोबत हिंदू रिती-रिवाजाप्रमाने लग्न केलं आहे. तो अनेक वेळा सोशल मीडियावर हिंदू धर्म साजरा करतानाही दिसला आहेत.
त्यानंतर विदेशातील असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी हिंदी किंवा संस्कृतमध्ये टॅटू काढले आहेत. ज्यामध्ये Rihanna, David Beckham, Vanessa Hudgens, Miley Cyrus, Tommy Lee Brittany Snow, Jessica Alba, Alyssa Milano, Adam Levine या सेलिब्रिटींचा समावेश आहे.