Kobe beef croquettes: हे ऑनलाइनचे युग आहे, अशा परिस्थितीत तुम्हाला कोणतीही वस्तू हवी असेल तर तुम्ही ती लगेच ऑनलाइन ऑर्डर करता. अनेक कंपन्या 30 ते 40 मिनिटांत ऑर्डर पोहोचवण्याचा दावा करतात. मात्र जपानमध्ये एक अशी डिश आहे. जिची ऑर्डर केल्यानंतर ती मिळवण्यासाठी तब्बल 38 वर्ष वाट पाहावी लागते. असं काय आहे या डिशमध्ये जाणून घेवूया. 


डिश मिळण्यासाठी 38 वर्षे वाट पाहावी लागेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 चमचमीत पदार्थ खायला कुणाला आवडत नाही. असे पदार्थ खाण्यासाठी आपण हॉटेलात जातो नाही तर ऑर्डर करतो. अवघ्या काही मिनिटांत ती ऑर्डर आपल्याला घरपोच मिळते. मात्र जपानमधली एक डिश या प्रक्रियेलाच अपवाद ठरलीय..या डिशचं नाव क्रोक्वेट..तुम्ही जर या डिशची आत्ता ऑर्डर केली तर तुम्हाला ती डिश मिळण्यासाठी 38 वर्षे वाट पाहावी लागेल. 


ऑर्डर करणा-यांना खूप संयम बाळगावा लागतो


आता तुम्ही म्हणाल या डिशमध्ये असं आहे तरी काय? जपानमधल्या ह्योगो प्रांतात असाहिया नावाचं एक दुकान आहे,  शिगेरू निट्टाचे कुटुंब हे दुकान चालवतात.. हे कुटुंब गेल्या 96 वर्षांपासून कोबे बीफ क्रोक्वेट नावाचे मांसाहारी पदार्थ विकतात.  लाल अँडीज आणि मांस यापासून ही डिश तयार केली जाते. तुम्ही  आज जर ही डिश ऑर्डर केली तर तुम्हाला ती 38 वर्षांनंतर खायला मिळेल, म्हणून ऑर्डर करणा-यांना खूप संयम बाळगावा लागतो. यातील प्रत्येक क्रोक्वेट10 सेमी रुंद आणि 100 ग्रॅम वजनाचा असतो आणि त्याला 'किवामी' असंही म्हणतात. एका बॉक्समध्ये 10 क्रोक्वेट असतात. प्रत्येक गोल्डन क्रोक्वेटमध्ये 30 ग्रॅम कोबे बीफ असतं. निट्टा ही डिश सुमारे 170 रुपयांना विकतात, मात्र हा व्यवहार खूप स्वस्त असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. विकल्या जाणाऱ्या क्रोक्वेटवर त्यांचं 170 रुपयांचं नुकसान होतं, बीफ महाग असल्यानं आपलं नुकसान होतं असं निट्टा यांचं म्हणणं आहे. मात्र तोट होत असतानाही लोकांना उच्च दर्जाचं कोबे बीफ चाखता यावं आणि ग्राहकांना बीफचे इतर पदार्थ खाण्यासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी त्यांचा हा खटाटोप आहे. विशेष म्हणजे 38 वर्षानंतर ऑर्डर मिळणार असली तरीही ग्राहकांचा त्यांना चांगला प्रतिसाद लाभतोय. यातच या डिशची जपानमध्ये किती लोकप्रियता आहे हे स्पष्ट होतं.