बाबासाहेबांचे स्मारक लंडनमध्ये उभारण्याचा मार्ग मोकळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक लंडनमध्ये उभारण्याचा मार्ग आता मोकळा
नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक लंडनमध्ये उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला. या संबंधी सुरू असलेला खटला राज्य सरकारने जिंकलाय. हे स्मारक सर्वसामान्यांसाठी बंद करण्याचा निर्णय तिथल्या प्रशासनाने घेतला होता. मात्र महाराष्ट्र सरकारने याविरोधात अपील करत हा खटला जिंकलाय.
आता सर्वसामान्यांसाठी हे स्मारक खुलं राहणार आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये बाबासाहेब शिकत असताना १९२१-२२ साली पूर्व लंडन भागातल्या १० किंग हेन्री या वास्तूत राहात होते. या वास्तूत आता बाबासाहेबांचं वस्तूसंग्रहालय आणि स्मारक बनवण्यास युके सरकारने परवानगी जारी केलीय.
राज्य सरकारने ही वास्तू ३० लाख पाऊंड्सना विकत घेतली होती. मात्र इथे वस्तू संग्रहालय आणि स्मारक उभारण्यास युके सरकारने परवानग्या रोखल्या होत्या.