या देशात दुध मिळतंय ८० हजार रूपये लीटर
या देशाची परिस्थिती एवढी बिघडली आहे की, व्हेनेयझुलाचे लोक शेजारील राष्ट्र कोलंबियात पलायन करीत आहेत.
कराकस : या व्हेनेएझुला देशात दुधाचा भाव ८० हजार रूपये लीटरपर्यंत गेला आहे्. या देशात फक्त दुधचं नाही, सर्वच पदार्थांचे भाव वाढले आहेत. जगातील सर्वात मोठं तेल भांडार असतानाही या देशाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. या देशाची परिस्थिती एवढी बिघडली आहे की, व्हेनेयझुलाचे लोक शेजारील राष्ट्र कोलंबियात पलायन करीत आहेत.
एक पाव हजारो रूपयांना
व्हेनेएझुलामध्ये एक पाव हजारो रूपयांना मिळतोय. एक किलो मटणाचा भाव ३ लाख रूपये झाला आहे आणि एक लीटर दुधासाठी ८० हजार रूपय खर्च करावे लागत आहेत तसेच एक लीटर दुधासाठी ८० हजार रूपये खर्च करावे लागत आहेत.
चुकीचं आर्थिक धोरणं भोवली
या देशाने जगभरातील देशांना आव्हान केलं आहे की, व्हेनेएझुलाची आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी जगभरातील देशांनी पुढे यावं. दुसरीकडे कोलंबियाने म्हटलं आहे की, आतापर्यंत व्हेनेएझुलाच्या १० लाख लोकांनी कोलंबियात आले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर देखील दबाव येत आहे. देशाची आर्थिक धोरणं चुकीचं ठरल्याने देशात भूकबळी वाढले आहेत. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने ही परिस्थिती आल्याचं सांगण्यात येत आहे.