`9 ते 5 Job करणारे आयुष्य उद्धवस्त करतायेत`; 23 वर्षीय कोट्याधीश तरुणाने सांगितला यशाचा गुरुमंत्र
9 to 5 job wasting lives: लोक 9 ते 5 नोकरी करुन आपल्या आयुष्याबरोबर नेमकं काय करत आहेत याचा त्यांनी विचार केला पाहिजे असं हा तरुण सांगतो. यासाठी तो स्वत:चं उदाहरण देताना लोकांनी 9-5 नोकरी सोडली पाहिजे असं ठामपणे सांगतो.
9 to 5 job wasting lives: वयाच्या 23 व्या वर्षी आपल्या बुद्धीच्या जोरावर कोट्याधीश झालेल्या तरुणाने जे लोक 9 ते 5 नोकरी करतात ते आपलं आयुष्य उद्धवस्त करत असून ते आयुष्य फुकट घालवत असल्याचा दावा केला आहे. नोकरदारवर्गाबद्दल असं विधान करणाऱ्या मुलाचं नाव आहे कॅम मोआर. कॅमने स्वत: नोकरीला लाख मारली असून तो इतरांनाही नोकरी सोडण्याचा सल्ला देतो. सध्या कॅम फार समाधानी असल्याचे असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा कॅम आहे तरी कोण? तर कॅम हा एका ई कॉमर्स उद्योग सुरु करणारा नवउद्यमी आहे. कॅमच्या यशासंदर्भात 'द सन'ने वृत्त दिलं आहे.
...म्हणून त्याने नोकरी सोडली
कॅमप्रमाणे जगण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना तो इतकंच सांगतो की असं आयुष्य जगणं कोणालाही शक्य आहे. कॅम हा कारपेन्टर म्हणजेच सुतारकाम करण्यासंदर्भातील प्रशिक्षण घेत होता. मात्र प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण होण्याच्या 6 महिने आधीच तो या प्रशिक्षण वर्गातून बाहेर पडला. इतक्या कमी मानधनासाठी 12-12 तास राबणे योग्य नाही असं कॅमचं म्हणणं होतं. कॅमने 2020 साली कार्पेटींगचं क्षेत्र सोडलं आणि ई कॉमर्समध्ये काहीतरी करण्याचं त्याने ठरवलं. त्याने हिंमत करुन घेतलेला हा निर्णय त्याच्या पथ्याशी पडला. आता तो महिन्याला 2 कोटी रुपये कमवतो. 'डेली मेल'ला दिलेल्या माहितीनुसार जेव्हा मोठ्या प्रमाणात पैसा मिळू लागला तेव्हा आपल्यालाच आश्चर्य वाटू लागलं असं कॅम म्हणाला. "अर्थात यात धोका होताच कारण मी शुन्यातून सुरुवात केली. मात्र हेच करायला लोक फार घाबरतात. मात्र असे घाबरणारे लोक काहीही विचार न करता आपलं आयुष्य खराब करुन घेत आहेत," असं कॅम म्हणाला. कॅम हा अनेकदा सुट्ट्यावर असल्याचे आणि आयुष्य एन्जॉय करत असल्याचे फोटो पोस्ट करत असतो. कॅम हा दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये राहतो.
लेक्चरही घेतो...
"तुम्ही शाळेत जायचं, मग डिग्री घ्यायची आणि उद्योगात अडकून जायचं असं आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं. घर खरेदी करा आणि त्यानंतर त्याचे पैसे फेडण्यात आपलं आयुष्य वाया घालवा. मी सुद्धा याच विचाराने काही काळ काम करत होतो. मात्र यामधून मी किती पैसे कमवू शकतो याचा हिशोब लावला तेव्हा यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला," असं कॅम म्हणतो. सध्या आपण जसं जगत आहोत तसं आयुष्य असावं असं कॅमचं स्वप्न होतं असंही तो मुलाखतीत म्हणाला. कॅम हा 'सिक्स फिगर ड्रॉप शिपर' नावाच्या कंपनीच्या माध्यमातून ई-कॉमर्स इंडस्ट्रीसंदर्भातील लेक्चर्स देतो. 2020 मध्ये त्याने आपला ब्रॅण्ड लॉन्च केल्यानंतर आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक लोकांना प्रशिक्षण दिलं आहे.
लोकांनी विचार केला पाहिजे
लोकांनी 9 ते 5 जॉब सोडावा असं कॅम अगदी आत्मविश्वासाने सांगतो. तो त्याच्या लेक्चर्समधूनही हेच सांगतो. यासाठी तो स्वत:चं उदाहरण देतो. "लोक त्यांच्या आयुष्याबरोबर नेमकं काय करत आहेत याचा त्यांनी विचार केला पाहिजे. 9 ते 5 च्या शिफ्टमध्ये काम करुन आयुष्य खराब करुन घेण्याव्यतीरिक्त ते काय करतात याचा त्यांनी विचार केला पाहिजे," असं कॅम म्हणतो. कॅमच्या सध्याच्या घराची किंमत साडेसहा कोटी रुपये इतकी आहे. त्याने नुकतीच बीएमडब्ल्यू एम 5 कारही विकत घेतली आहे.